डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर




डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर
बीड ।
सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या अनेक वर्षे खास करून कोरोना कालावधीतीलच नव्हे तर समाजहिताकडे पाहून आजतागायत सर्व सामान्यांची निस्वार्थ सेवेत कार्यरत असल्याबद्दल कार्याचा गौरव म्हणून विशेष प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्काराचे मुंबईत वितरण होणार आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून नाट्य कलाकार,सामाजिक कार्यकर्ते यांना समाजभूषण व पत्रकार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन दैनिक लोकांकीत वृत्तपत्ताच्यावतीने सन्मानित केले जाते. डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी कोरोना कालावधीत वाड्या ,वस्ति,तांड्यावर जाऊन दिलेली नि:शुल्क आरोग्य सेवा व भ्रष्टाचार विरोधातील जिद्दीने सातत्याने लढत असलेली लढाई,बीड जिल्ह्य़ातील सामाजिक प्रश्नांवर तसेच ग्रामिण भागातील विविध समस्यांना वाचा फोडुन सर्वसामान्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी प्रशासनाविरोधात करण्यात येत असलेली लक्ष्यवेधी आंदोलने त्यातुन गोरगरीबांना शोषितांना न्याय मिळवून देण्याची आपली तळमळ या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पनवेल येथे दि.२९ मे रविवार रोजी आ.प्रशांत ठाकूर,आ.महेंद्र दळवी,बाळासाहेब पाटील,आ.संदिप क्षीरसागर,नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार,जे.एम.म्हात्रे,ज्येष्ठ समाजसेवक नानजीभाई ठक्कर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार दिला जाणार आहे. अशी माहीती दैनिक लोकांकीत पनवेल चे संपादक संजय पवार यांनी दिली आहे.निवडीबद्दल डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा