परळी येथे खिवारी भटक्या समाजाची राज्यव्यापी 4 थी कार्यशाळा 29 मे 2022 रोजी होणार -शिवाजी भोसले




परळी येथे खिवारी भटक्या समाजाची राज्यव्यापी 4 थी कार्यशाळा 29 मे 2022 रोजी होणार -शिवाजी भोसले

अंबाजोगाई  ।

महाराष्ट्रातील मूळ भटक्या जमाती प्रवर्गातील जोशी, गोंधळी ,वासुदेव, बागडी ,चित्रकथी ,नंदीवाले ,पांगुळ, सरोदे ,आणि ,काशी पाडी ,या खिवारी पंथातील नऊ जाती पोटजाती च्या समाजाची चौथी राज्यव्यापी कार्यशाळा परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे दिनांक 29 मे 2022 रोजी रविवारी सकाळी ठीक 9:30 वाजता तिरुपती मंगल कार्यालय इतके कॉर्नर गंगाखेड रोड परळी वैजनाथ येथे होणार आहे अशी माहिती जोशी समाजाचे युवा नेते शिवाजी भोसले यांनी दिली तसेच या कार्य शाळेला महाराष्ट्रातील जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे देशाला स्वातंत्र्य मिळून अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे साफल्य होत असतानामूळ भटका समाज मात्र विश्याचे घोट पीत आहे ना राहयला घर ना कसायला शेत ना संपत्तीत वाटा ना सत्तेत वाटा भीक मागून आपल्या कुटुंबाला बायका मुलांना जगवणे व पोटाला तुकडा मिळेल तिकडे भटकत राहणे यामुळे अन्न वस्त्र निवारा व शिक्षण आरोग्य या मूलभूत गरजांचा पूर्ण झाल्या नाहीत यांना ना समाजव्यवस्था स्वीकारायला तयार नाही राज्यव्यवस्था त्यांचे हक्क द्यायला तयार नाही गेल्या 75 वर्षांपासून अनेक आंदोलने झाली मोर्चा काढले मागण्या मांडल्या पाठपुरावा केला मात्र पदरात काहीच पडले नाही या सर्व पार्श्वभूमीवर आता संघटनात्मक वेगळे नियोजन करून आपले हक्क व अधिकार मिळवण्यासाठी या चौथ्या कार्यशाळेचे आयोजन केले जात आहे असल्याची माहिती महाराष्ट्राचे समन्वयक प्राध्यापक शिवाजी जोशी यांनी दिली या राज्यस्तरीय कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी माननीय किशोर महाराज (जळगाव) वामन मापारी (नगर )मा शिवाजीराव जोशी (लातूर) माननीय शिवाजीराव वायफळकर (पुणे )गोपीचंद इंगळे (शिर्डी )सीता ताई ,अशोक पवार, गणेश पळकर ,राजेंद्र साळुंखे ,अशोक पवार, (मुंबई) अनुराधा सरवदे (पंढरपूर) कल्पना जोशी (कर्नाटक) पुनम ताई ,तावरे ,निलेश निकम, दत्ता साळुंखे ,(पुणे )सारिका जाधव (मुंबई) इत्यादी सह महाराष्ट्र राज्यातील सर्व कोर कमिटी सदस्य खिवरी एकता महाराष्ट्र यांनीही निमंत्रित करण्यात आले आहे या कार्यशाळेत आयोजनामागील भूमिका ऐतिहासिक पार्श्वभूमी व आजची परिस्थिती खिवारी एकता महाराष्ट्राची गरज त्यामागील विचार व लॉजिक भविष्यातील वाटचाल आणि त्याबाबतचे नियोजन या विषयावर प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार असून संघटनेचे कार्यालय सुविधा संघटनेचा ध्वज कार्याचे स्वरूप ठोस निर्णय घेतले जाणार आहेत या कार्यशाळेला सर्व समाज बांधव विविध संघटनेचे पदाधिकारी महिला प्रतिनिधी समाजातील अधिकारी युवक विविध पक्षातील समाजाचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा संघटन मजबूत करून समाजाला न्याय हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्षाला तयार व्हावे असे आवाहन शिवाजी भोसले यांनी केले आहे या कार्यशाळेत सकाळी 9 वाजता नाश्ता व दुपारी 2 वाजता भोजनाची व्यवस्था कार्यक्रम स्थळी करण्यात आली आहे कार्यक्रम वेळेवर सुरू होईल.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा