डॉ.बाबु जोगदंड यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर




 

“मुबंई याठिकाणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित होणार “।

बीड ।
दैनिक लोकांकित वृत्तपत्राचा सहावा वर्धापन दिन पनवेल मध्ये होणार असून वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वृत्तपत्राबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून नाट्य कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांना समाजभूषण आणि विविध माध्यमांतील पत्रकार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. बीड जिल्हयातील गोरगरिबांना सतत मदत करणारे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व चौसाळा कृमभुमी असलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबु जोगदंड साहेब यांच्या सामाजिक कार्याची पावती म्हणून त्याना समाजरत्न पुरस्काराने गोरविण्यात येणार आहे.
डॉक्टर बाबु जोगदंड यांनी अंध अपंग निराधार वृद्धांना सतत मायेचा हात देऊन आर्थिक मदत केली आहे व करत आहेत तसेच कोरोना काळात वाडी वस्ती तांड्यावर जाऊन गोरगरिबांना एक महिना पुरेल एवढे राशन किराणा चे वाटप त्यांनी कोरोना काळामध्ये केले होते चौसाळा जिल्हा परिषद सर्कल मध्ये राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रीय असा त्यांचा नेहमीच सहभाग असतो बीड चे लाडके आमदार माननीय संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्य त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर केलेले आहे प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीला सामाजिक उपक्रम राबवून वृक्षलागवड करणे , अन्नधान्य पुरवठा करणे, गोरगरिबांना अनाथांना राशन वाटप करणे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातील प्रश्न सोडवणे अशा पद्धतीचे विविध उपक्रम डॉक्टर बाबु जोगदंड यांच्यामार्फत नेहमीच राबवले जातात. डॉक्टर बाबु जोगदंड यांनी गोरगरिबांसाठी शासकीय हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया, आरोग्य शिबिर, औषध वाटप अशा पद्धतीची शिबिर सुद्धा आयोजन केलेली आहेत. या सर्व सामाजिक कार्याचा आढावा घेऊन दैनिक लोकांकित परिवारातर्फे त्यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे
या कार्यक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, अलिबाग विधानसभेचे आमदार महेंद्र दळवी, बाळासाहेब पाटील ( महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष, भाजप), संदीप भैया क्षिरसागर – आमदार बीड विधानसभा सभा मतदार संघ , जयवंत सुतार, महापौर नवी मुंबई मनपा, जे एम म्हात्रे मा. नगराध्यक्ष, पनवेल, जेष्ठ समाजसेवक नानजीभाई ठक्कर ठाणावाला, सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक लोकांकितचे बीड जिल्हा प्रतिनिधी विवेक कुचेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील सिने, नाट्य कलावंत उपस्थित राहणार असून यावेळी मनोरंजनासाठी लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक २९/५/२०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता पनवेल येथे होणार आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा