पिंपळवाडी सेवा सहकारी सोसायटी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात




चेअरमनपदी शामराव तुपे तर व्हाईस चेअरमनपदी सिताराम बहिरवाळ यांची बिनविरोध निवड

बीड ।

तालुक्यातील पिंपळवाडी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शामराव तुपे तर व्हाईस चेअरमनपदी सिताराम बहिरवाळ यांची बिनविरोध निवड झाली असून ही सोसायटी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात आली आहे.

पिंपळवाडी सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून शिवसेनेचे १३ पैकी १० संचालक बिनविरोध निवडून आले असून ही सोसायटी शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे खंदे समर्थक शामराव तुपे यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी सिताराम बहिरवाळ यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संचालक श्रीरंग खटाने, पठाण मज्जू, संभाजी बहिरवाळ, आण्णा भोसले, रूक्मिणी विठ्ठल पाखरे, आसराबाई रामभाऊ धुमाळ, श्रीरंग प्रभाळे, उत्तम साळवे उपस्थित होते.

बीड तालुक्यातील बहुतांश सेवा सहकारी सोसायट्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या ताब्यात आलेल्या आहेत. पिंपळवाडी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन निवड बिनविरोध करण्यासाठी माजी सरपंच अर्जुन बहिरवाळ, युवराज बहिरवाळ, अर्जुन पाटील, मधुकर पाटील, ज्ञानोबा तुपे, अंकुश वाघुले, भिमराव तुपे, शेख शब्बीर भाई, हरीभाऊ भोसले, विशाल पाखरे, गणेश कलढोणे, शिवराज भोसले आदींनी परिश्रम घेतले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा