आपुलकीचे ठिकाण म्हणजे भैय्यासाहेबच -किशोर चव्हाण




वाढदिवस विशेष ।

गेवराई हा तसा संपन्न शेती, मातीचा पाट आणि गोदा – सिंधफणेचा काठ असणारा समृद्ध तालुका आहे. दोन राष्ट्रीय महामार्गांचा उभा आडवा धागा गेवराईला मोठ्या शहरांशी सहज जोडतो. पण हे रस्ते, ह्या नद्या अन् काळ्या मातीचा विस्तीर्ण भूभाग असतानांही विकासाच्या वाटेवर गेवराई तालुका पाहिजे तितका नाही. जुन्या समंजस आणि सर्वकष राजकारणाला गेल्या पंचवीस तीस वर्षात जी घरघर लागली त्यात याचे मुळ शोधवे लागेल. सहकारात दादांनी जे योगदान दिले तेवढ्यावरच गेवराईतील कष्टकरी, शेतकऱ्यांची आर्थिक मदार असल्याचे दिसून येईल. बाकीच्यांनी विरोधातच धन्यता मानली, तर भैय्यासाहेब यांनी अनेक आवाहनांचा सामना करत दमदारपणे दादांच्या कृषीविकासाची ही कावड समर्थपणे पेलण्याची जबाबदारी निभावली. यावर्षात तर याची प्रकर्षाने जाणिव झाली, आणि संबंध गेवराईला देखील बरच काही झाल्यावर हे पटायला लागले, येणाऱ्या काळात याचे अधिक भान गेवराईकरांना यावे. आणि तरच विकासाच्या वाटा मोकळ्या व्हायला लागतील. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विधायक कामाने आपल्या नावाचा ठसा महाराष्ट्रभर ज्यांनी उमटवला, असं गेवराईच्या राजकारणात एकच नाव आहे, ते म्हणजे अमरसिंह पंडित. सत्तेच्या चाव्या कुणाकडेही असो, सत्ता असो अथवा नसो, पण कायमच सर्वसामान्यांच्या हक्काचे एकमेव आधारकेंद्र, आपुलकीचे ठिकाण म्हणजे भैय्यासाहेबच. माणसाकडे जे काही आहे त्याचा लोकांसाठी जास्तीत जास्त कसा वापर करता येईल याचं बीड जिल्ह्याच्या राजकारणातील सध्याच्या घडीला आघाडीवर कोणाचे नाव घेतले जात असेल, तर ते म्हणजे अमरसिंह शिवाजीराव पंडित यांचेच.
जल संवर्धन (पाझर तलाव, नदीचे पुनरूजीवन, गोदावरी वरील बँरेजेस, सिरसमार्गचा उच्च पाणी पातळी बंधारा ) महापुर, शारदा प्रतिष्ठान, कोरोना काळ आणि आत्ताचा उसाचा भयावह प्रश्न यात भैय्यासाहेब यांनी भरीव काम करून दादांचा लोकहीताचा वारसा सक्षमपणे पेलला आहे. शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून रबवल्या जात असलेला ‘जल शारदा’ प्रकल्प व टाकळगाव उच्च पाणी पातळी बंधाऱ्याची मान्यता यामाध्यमातून गेवराई तालुक्यातील लोकांच्या जीवनात संपन्नतेची भरच पडणार आहे. जायकवाडीच्या पाण्यातील बीडचा वाटा मिळवून देण्यातही भैय्यासाहेबांचाच पुढाकार असतो. हे ही आपण सर्वजन जाणतो.


कायम गेवराई तालुक्याच्या भल्यासाठी, इथल्या कष्टकरी, शेतकरी, आणि तरूणांच्या हक्कासाठी संबंध तालुक्यात रोज भटकंती करणारे, सुख-दुःखात उभे राहणारे, पाठीवरती विश्वासाने हात ठेवणारे आदर्श नेतृत्व मा. अमरसिंह (भैय्यासाहेब) पंडित यांना जन्मदिना निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा