बीडची रणरागिणी अर्चनाताई कुटे




बीडची रणरागिणी
अर्चनाताई कुटे
-बीड
बीडसारख्या ग्रामिण जिल्ह्यामधून एक महिला पतीच्या आग्रहाखातर एमबीएची परीक्षा पास होते आणि चाचपडत असलेल्या उद्योगाची एमडी होते. तोच उद्योग अवघ्या दहा वर्षात या महिलेच्या नेतृत्वाखाली उत्तुंग भरारी घेतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ब्रॅन्ड मिळवतो. ही किमया करून दाखवली आहे ती बीड शहरातील कुटे उद्योग समुहाने आणि त्याच्या एमडी आहेत अर्चना सुरेश कुटे, या कुटे उद्योगाने यशाची अनेक शिखरे पार केली. विभाग, राज्यापुरते मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय उद्योगामध्ये आपली छाप सोडली आहे. तिरूमला ऑईल देशभरामध्ये नावलौकीक मिळवत आहे. कुटे ग्रुपचे हे यश नविन उद्योजकांना नक्कीच दिशादर्शक आहे.
बीडसारख्या शहरामध्ये सुरेश कुटे यांनी छोट्या मोठ्या उद्योगातून आपल्या कामाला सुरूवात केली. काही ठिकाणी अपयश पदरी पडले तर काही ठिकाणी यशाने स्वागत केले. जिद्द, सचोटी आणि प्रामाणिकपणा मात्र कायम ठेवला. टप्प्या टप्प्याने पावले टाकत सुरेश कुटे यांनी कुटे उद्योग ग्रुपची स्थापना केली. याच उद्योगातून तिरूमला ऑईल वंâपनी जन्माला आली. विवाहानंतर सुरेश कुटे यांनी आपली पत्नी अर्चना कुटे यांना एमबीएचे शिक्षण घेण्यास भाग पाडले. हे शिक्षण पूर्ण झाल्यावर कुटे उद्योग समुहाच्या त्या एमडी झाल्या आणि या दाम्पत्याने कुटे उद्योग समुहात स्वत:ला झोवूâन दिले. बीडसारख्या ग्रामिण आणि दुर्गम जिल्ह्यातून एक महिला आंतरराष्ट्रीय पातळीवरील ब्रॅन्ड असलेला उद्योग यशस्वीपणे चालू शकते हा विश्वास अर्चना कुटे यांनी निर्माण केला. या ग्रुपचे संस्थापक सुरेश कुटे यांनी आपल्या व्यवसायात कौटुंबिक वातावरण निर्माण केले. उद्योग समुहाने यशाचे अनेक विक्रम प्रस्थापित केले. सुरेश कुटे यांच्या मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळे जिद्द, आत्मविश्वास निर्माण झालेल्या अर्चना कुटे यांनी उद्योगाचे आव्हान लिलया पार पाडले. आज तिरूमला ऑईल वंâपनी देशातील ऑईल उद्योगात सर्वात टॉपवर आहे. अनेक राज्यामध्ये ही ऑईल वंâपनी उत्पादन करत आहे. ऑईल उत्पादन क्षेत्रात कुटे ग्रुपने आपला दबदबा निर्माण केला आहे. ऑईल उत्पादनासह जिनिंग, प्रेसिंग, दूध डेअरी, बँविंâग क्षेत्रामध्ये या समुहाने यश निर्माण केले आहे. संपूर्ण देशात पोहचलेल्या या कुटे ग्रुप उद्योगाने हजारो तरूणांना रोजगाराची संधी मिळवून दिली. हजारो कुटुंब उभे केले. नुकताच देशासह आंतरराष्ट्रीय मानाचा पुरस्कार या उद्योगसमुहाला प्राप्त झाला. दुबई येथे कुटे उद्योग ग्रुपचा सन्मान करण्यात आला. तिरूमला ऑईल वंâपनीने संपूर्ण देश पादाक्रांत करत असताना घराघरात प्रवेश मिळवला आहे. आपसुकच खाद्य तेल खरेदी करताना प्रत्येक जणांचा विश्वास तिरूमला ऑईलवर निर्माण झाला आहे. ऑईल वंâपनीत देशामध्ये उच्च स्थानावर असलेल्या कुटे उद्योग ग्रुप आता विविध उद्योगामध्ये आपले पाय पसरत आहे. उद्योग क्षेत्रात बरेच काही करायचे असल्याचा आत्मविश्वास सुरेश कुटे यांनी व्यक्त केला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा