आरोग्याच्या प्रश्नी माजीमंत्री क्षीरसागर यांचे मोठे योगदान !




आरोग्याच्या प्रश्नी माजीमंत्री क्षीरसागर यांचे मोठे योगदान

खा. जलील यांनी आधी औरंगाबादकडेच लक्ष द्यावे – डाके, मुखींद लाला , पठाण काटे

बीड l  जिल्ह्यातील आणि बीड मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात पालकमंत्री पदावर असतानाच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आरोग्याचे प्रश्‍न सातत्याने पाठपुरावा करून बीड रायमोह आणि शिरूर या ठिकाणी नवीन अद्यावत इमारती व्हाव्यात यासाठी केलेले प्रयत्न आता कामी येणार आहेत लवकरच या तीनही इमारतींचे काम पूर्ण होणार असून क्षीरसागर यांनी काय केले असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांनी आधी औरंगाबाद कडेच लक्ष द्यावे असे प्रत्युत्तर ज्येष्ठ नेते अरुण डाके नगरसेवक मुखिद लाला,सुलेमान पठाण,सतीश काटे यांनी दिले आहे

काही दिवसापूर्वी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे बीड येथे आले असता त्यांनी माजी मंत्री क्षीरसागर यांनी काय केले असा प्रश्न उपस्थित केला होता खासदार जलील यांनी आधी आपल्या मतदार संघात सध्या सुरू असलेल्या आरोग्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे तसेच आरोग्याच्या प्रश्नी मोठे योगदान देण्याचा प्रयत्न करायला हवा कुठलीही माहिती न घेता बेताल वक्तव्य करणाऱ्या खा जलील यांनी माहिती घेणे गरजेचे होते माजी मंत्री क्षीरसागर पालकमंत्री असतानाच बीड येथील 200 खाटाचे नवीन रुग्णालय व्हावे यासाठी 84 कोटी 72 लक्ष रुपयाचे अंदाज पत्रक तयार करून यासाठी प्रयत्न केले त्यासाठी 58 कोटी 21 लक्ष रुपये प्रशासकीय मान्यता मिळाली असून याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तसेच रायमोहा येथे 13 कोटी 84 लक्ष रुपयाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते त्यासाठी 9 कोटी 2 लक्ष रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर शिरूर येथील रुग्णालयासाठी 16 कोटीचा प्रस्ताव दाखल करून अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते त्यासाठी 11 कोटी 9 लक्ष रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाले आहे लवकरच या तीनही रूग्णालयाच्या अद्यावत इमारती उभारण्यात येणार आहेत याच वेळी आयुष्य रुग्णालयासाठी शंभर खाटांचे काम प्रगतिपथावर आहे ही सर्व कामे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकाळात सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून घेतले आहेत असे असताना क्षीरसागर यांनी काय केले हा प्रश्न एखाद्या खासदाराने उपस्थित करणे हास्यास्पद आहे बीड जिल्हा आणि बीड मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न माजीमंत्री क्षीरसागर यांनी सातत्याने प्रयत्न करून अनेक विकासाची मोठी मोठी कामे खेचून आणले आहेत त्यामुळे खासदार जलील यांनी आधी आपल्या मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नी लक्ष घालावे असे प्रत्युत्तर ज्येष्ठ नेते अरुण डाके, नगरसेवक मुखीदलाला ,सुलेमान पठाण, सतीश काटे यांनी दिले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा