काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हा सरचिटणीस पदी – लक्ष्मण दादा पवळ 




काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हा सरचिटणीस पदी –    लक्ष्मण दादा पवळ 
बीड । गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे लक्ष्मण दादा पवळ यांनी गोर गरीब सर्व सामान्य शेतकरी कष्टकरी मोल मजुरी करणाऱ्या जनतेच्या अडी अडचणीच्या काळामध्ये धावून येणारे सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे लक्ष्मण दादा पवळ यांची जिल्ह्यात ओळख आहे ,त्यांनी या पूर्वी मराठा संघटने मध्ये एक दिलाने काम केले , काही महिन्यांपूर्वी त्यांनी खाजदार रजनीताई पाटील यांच्यावर विश्वास टाकून काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता ,त्यांच्या कार्याची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन त्यांना  खा.रजनीताई पाटील , माजी मंत्री अशोकरावजी पाटील , बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, राज्याचे युवा नेते आदित्य दादा पाटील यांनी जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
       या प्रसंगी जिल्ह्याचे उपाध्यक्ष नवनाथ बापू थोटे, जिल्ह्याचे युवा नेते व जिल्हा उपाध्यक्ष राहुल भैया सोनवणे, केज चे नगराध्यक्ष पशुपती दांगट , औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसचे युवा नेते किरण पाटील , बाळासाहेब ठोंबरे, प्रवीण कुमार शेप, प्रताप मोरे , शिरूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश सानप, बीड विधानसभेचे युवा नेते संभाजी जाधव, राज्य विधी सेलचे प्रदेश सरचिटणीस ऑड.गणेश  करांडे, संतोष रावजी निकाळजे,  रोजगार विभागाचे जिल्हा अध्यक्ष विष्णू मस्के, जय प्रकाश आघाव, अशोक राव देशमुख,आदी जिल्हा काँग्रेस कमिटीचे  पदाधिकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा