शिवसंग्राम  महिला  आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी तेजश्री ताई खामकर




शिवसंग्राम  महिला  आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी तेजश्री ताई खामकर

 धारूर ।
  महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी तेजश्री ताई खामकर यांची निवड आमदार विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम चे प्रदेश अध्यक्ष  रामराज नजी घाग यांच्या सूचनेवरून शिवसंग्राम चे जिल्हा अध्यक्ष नारायण दादा काशीद यांच्यासहमतीने तसेच जिल्हा सरचिटणीस अनिल भाऊ घुमरे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष किसन दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थिती शिवसंग्राम व शिवसंग्राम भवन नगर रोड बीड येथे शिवसंग्राम महिला आघाडीची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम व्यासपीठावरील उपस्थित मान्यवराच्या हस्ते मासाहेब जिजाऊ च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शिवसंग्राम महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष अँड मनीषा ताई कुपकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंग्राम परिवाराच्यावतीने अभिष्टचिंतन करण्यात आले यावेळी महिला आघाडीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याच्या निवडी जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड मनीषा ताई कुपकर यांनी पदाधिकाऱ्याच्या निवडी जाहीर केल्या जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे व जिल्हा उपाध्यक्ष किसन दादा कदम व जिल्हा अध्यक्ष अँड मनीषा ताई कुपकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली यामध्ये महिला आघाडी च्या बीड शहर उपाध्यक्षपदी संगीताताई ठोसर महिला आघाडीच्या केज तालुका अध्यक्षपदी तेजश्री ताई खामकर महिला आघाडीच्या सोनी जवळा तालुका केज गन प्रमुख पदी स्वातीताई कुपकर महिला आघाडीच्या विडा तालुका केज गट प्रमुख पदी अंजलीताई पटाईत यांना मान्यवराच्या व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या समक्ष नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे व अभिनंदन केले जात आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा