लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती समिती कार्यकारिणी जाहिर




लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती समिती कार्यकारिणी जाहिर
अध्यक्षपदी कल्याण आखाडे तर सचिवपदी पंकज चांदणे
बीड ।
      शहरातील लोकशाहिर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहिर झाली असून आ.संदिप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण आखाडे यांची अध्यक्षपदी तर पंकज चांदणे यांची सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
लोकशाहिर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती उत्सव समितीची बैठक शनिवार दि.23 जुलै रोजी पार पडली. आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी सुनिल धांडे, हेमंत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण आखाडे अध्यक्षपदी तर पंकज चांदणे यांची सचिवपदी निवड करण्यात आली. यावर्षी जयंतीच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविले जाणार असून निवड होताच कार्यकारिणी तयारीला लागली आहे. या बैठकी दरम्यान हनुमंत वाघमारे, विलास मोमीन, संतोष थोरात, अशोक वाघमारे, राजु महुवाले, गोविंद साठे, जीवन सुतार, बिभीषण लांडगे, मनोज चांदणे, विनोद हातागळे, नागेश दुबळे आदींची उपस्थिती होती.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा