पंकजाताईंचे जिल्हाभरात सेवा कार्यातून अभिष्टचिंतन..!-राजेंद्र मस्के




पंकजाताईंचे जिल्हाभरात सेवा कार्यातून अभिष्टचिंतन..! राजेंद्र मस्के
शहर भाजपाने बीड बसस्थानकातील खड्डे बुजवले.
बीड ।
भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचा वाढदिवस जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. प्रसिद्धीचा मोह न ठेवता, सामाजिक भान ठेऊन आपला वाढदिवस सेवा कार्यातून साजरा व्हावा अशी ईच्छा पंकजाताईंनी व्यक्त केली होती.
या ईच्छापूर्तीसाठी आरोग्य शिबीर, रक्तदान. कोरोना डोसचे वितरण, स्वच्छता मोहीम, गोरगरीब महिलांना साडी वाटप, मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर, अनाथांना अन्नदान, वृक्षारोपण या सारखे सामाजिक उपक्रम राबवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचा उत्साह सेवा कार्यात रुजवला. सेवा कार्यामुळे सामान्य व गरजू लोकांना लाभ मिळाला. सामाजिक उपक्रमातून लोकांना आनंद व सेवाकर्त्यांना समाधान लाभते. या समाधानाचे रुपांतर निश्चितच आशिर्वादात होते. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा सामाजिक कर्तुत्वाचा वारसा घेऊन जाती धर्माच्या पलीकडे जाऊन वंचीतापर्यंत पंकजाताईंनी लोकाभिमुख नेतृत्व पोहचले आहे. सर्व घटकातील माणस पंकजाताईंना सदिच्छा व्यक्त करत आहेत. गोरगरीब, वंचित, कष्टकरी, शेतकरी, कामगार, सर्वसामान्यांचे आशिर्वादाच्या बळावर राजकीय व सामाजिक क्षितीजावर पंकजाताईंचे नेतृत्व कर्तुत्व संपन्न घडेल. असा विश्वास व्यक्त करून, निरोगी व उदंड आयुष्य लाभावे. अशा शुभेच्छा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केल्या.
महिला आघाडीच्या वतीने डॉ.जयश्रीताई मुंडे यांच्या पुढाकारातून दोनशे गरीब महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच बीड बसस्थानकात प्रचंड खड्डे व चिखल साचल्याने परिसराची वाईट दुर्दशा झाली होती. प्रवाश्यांची गैरसोय लक्षात घेऊन आज शहर भाजपा तर्फे बीड बसस्थानक परिसरातील साफसफाई व खड्डे बुजवण्याची मोहीम राबवण्यात आली. खड्डयामध्ये कचखडी टाकून खड्डे बुजवण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, ॲड. सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, भगीरथ बियाणी, विक्रांत हजारी, प्रा. देविदास नागरगोजे व बीड बसस्थानक चे अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या साफसफाई कामाचा शुभारंभ करण्यात आला.


या प्रसंगी अजय सवाई, डॉ. लक्ष्मण जाधव, अनिल चांदणे, किरण बांगर, कपिल सौदा, नागेश पवार, संग्राम बांगर, शांतीनाथ डोरले, विलास बामणे, गणेश पुजारी, ऋषी फुंदे, अमोल वडतिले, सुनिल मिसाळ, शेख इरशाद भाई, संतोष गवळी, ॲड. संगीता धसे, मीरा गांधले, संध्या राजपूत, शीतल राजपूत, लता राऊत, प्रीत कुकडेजा, संजीवनी राऊत, लता बुंदेले, बाळासाहेब घुमरे, महादेव खांडे, हरिदास तकिक, बाबुराव परळकर, शेख नईन खान, शेख अम्मू, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा