बीड जिल्ह्याच्या राजकारणाला पंकजाताईच्या नेतृत्वाची गरज – राजेंद्र मस्के




बीड।

जिल्ह्याच्या राजकारणाला पंकजाताईच्या नेतृत्वाची गरज !
आमच्या लाडक्या नेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचा आज वाढदिवस. त्या निमित्त सुरूवातीलाच कोटी कोटी शुभेच्छा. वाढदिवस ही संकल्पना त्यांना मान्य नाही. आठ दिवसापुर्वी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम करा असा निरोप त्यांनी दिला. पण बदलत्या काळात लाडक्या नेतृत्वाचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्यासाठी पर्वणी असते. जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या पंधरा वर्षापासुन मी पंकजाताईचे नेतृत्व बघतो. पाच वर्षे पालकमंत्री म्हणुन त्यांनी केलेली भरीव कामगिरी जनता कधीच विसरू शकत नाही. त्यांचं राजकारण अठरापगड जातीधर्माच्या कल्याणाचे असुन वैचारिक भुमिका केवळ विकासाच्या राजकारणाची आहे. जिल्ह्याच्या राजकारणात अपवादात्मक असं नेतृत्व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना जनहितवादी प्रेरणा मिळते. सकारात्मक विचाराची भुमिका खर्‍या अर्थाने सामान्य जनतेच्या कल्याणाची असते. त्यांचं पाच वर्षाचं पालकत्व आणि अडीच वर्षे आमच्या विरोधकांनी केलेलं पालकत्व यात जमिन अस्मानचा फरक असुन ज्या नेतृत्वाला केवळ विकास आणि सामान्य जनतेच्या सेवेसाठी समर्पण एवढेच राजकारण कळतं अशा नेतृत्वाची खर्‍या अर्थाने बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी अत्यंत गरज आहे.
स्व.गोपीनाथराव मुंडेंनी राजेंद्र मस्के यांना भाजपात प्रवेश दिल्यानंतर मध्यंतरी दुर गेलेले पुन्हा भाजपकर्ते झाले. पंकजाताईच्या नेतृत्वाशी जवळीक आल्यानंतर त्यांनी निष्ठेने कामाला सुरूवात केली. समाज चळवळीच्या माध्यमातुन काम करत असताना मला त्यांच्या नेतृत्वाची आवड निर्माण झाली. एक सकारात्मक नेतृत्व पालक मंत्री म्हणुन बीड जिल्ह्याच्या राजकारणात किती यशस्वी ठरलं? हे माझ्या सारख्या तरूणांनी जवळुन पाहिलं.अठरापगड जातीधर्माच्या लोकांना न्याय मिळवुन देण्याची क्षमता शिवाय सत्तेचा वापर केवळ सामान्य जनतेच्या कल्याणासाठी आणि जिल्ह्याचा विकास करायचा तर सबका साथ-सबका विकास या सुत्राचा अवलंब त्यांनी केला. म्हणून त्यांच्या नेतृत्वावर भाजपमध्ये सक्रिय झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर टाकली. तदनंतर कौटुंबिक जिव्हाळा पंकजाताई, प्रितमताई भगिनी कुटुंबियांच्या सोबत निर्माण झाला. राजकारणाच्या पलीकडे जावुन बंधुत्वाचं नातं रेशमी धाग्याने जणु काही बांधल्या गेलं. खंबीरपणे मुंडे भगिनीच्या पाठीमागे उभे राहण्याची संधी मिळाली. साहेबांचं दुर्दैवी निधन हा आमच्या आयुष्यातील फार मोठं संकट पण त्यांचा वारसा सक्षमपणे पंकजाताई चालवतात. बीड जिल्ह्यात अनेक पालकमंत्री आणि त्यांच्या कामाची पद्धत मी जवळुन पाहिली. मात्र ताई अशा एकमेव महिला नेतृत्व जिल्ह्याला लाभलं न भुतो न भविष्यति पाच वर्षात जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करताना रेल्वेचा प्रश्न मार्गी लावला. राष्ट्रीय महामार्ग निर्माण केले. गाव तिथे विकास काय असतो? हे दाखवुन दिलं. एवढंच नाही तर वंचित, उपेक्षित, दीनदलित, गोरगरिबांची सेवा कशी करावी हे त्यांच्या भुमिकेतुन प्रत्यक्ष दिसलं. त्यांच्या नेतृत्वाकडे विकासाची दुरदृष्टी असुन सुडाचे राजकारण न करता कल्याणकारी भुमिका त्यांची असते. जलयुक्त शिवार असो किंवा जलसंधारणाची कामे 2515 काय असते? हे त्यांनीच दाखवुन दिले. राजकारण करताना त्या कुणाचा द्वेष करत नाहीत, कुणाची निंदा नालस्ती न करता सुडाची भावना ठेवत नाहीत. आपलेपणाचं नातं जोपासुन बीड जिल्ह्यातील प्रत्येक माणसांवर त्यांचं कमालीचं प्रेम असतं. खरं म्हणजे कार्यकर्ता म्हणुन नेतृत्वाखाली काम करताना अगदी कमी वेळात त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर टाकली. संघटनात्मक काम आणि त्यांचं सतत मिळणारं मार्गदर्शन जबाबदारी सांभाळण्यासाठी महत्वाचं ठरतं. वास्तविक पाहता मुंडे साहेब अनेकदा माझ्या घरी भेट द्यायचे. तेव्हापासून कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला. तेच नातं पुढे घेवुन जाताना पंकजाताई, प्रितमताई भगिनी अगदी हक्कानं भेट देतात.त्यामुळे आमच्यातलं नातं केवळ औपचारिक नसुन कौटुंबिक आपलेपणाचं झालं. त्यांच्या पाठीमागे बंधुत्व, स्नेहभावातुन खंबीरपणे उभा राहण्याचा धर्म मी पाळत आलो आणि भविष्यात पाळण्यासाठी वचनबद्ध राहणार. जिल्ह्याच्या राजकारणात विविध पक्षाच्या अनेक राजकिय पुढारी आणि त्यांचं काम जवळुन पाहतो. पण पंकजाताई असं एकमेव नेतृत्व ज्यांना केवळ सकारात्मक राजकारण करावं वाटतं. खरं तर पालकमंत्री म्हणुन त्यांनी जिल्ह्यात अगदी विरोधकांच्या मनावरही राज्य केलं. कारण तसा त्रास कुणालाही होवु दिला नाही. त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांना असलेली विकासाची भुक मागे वळुन पाहिल्यानंतर बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी या नेतृत्वाची अत्यंत गरज असुन खर्‍या अर्थाने सत्तेच्या सारीपाटावर संधी मिळायलाच हवी. अनेकदा संधी सामान्य जनतेच्या अत्यंत फायद्याची ठरते. राजकारणात पद मिळतात आणि पदं जातं. पण मिळालेल्या संधीचं सोनं जनकल्याणासाठी करावं लागतं हे पंकजाताईंनी दाखवुन दिले. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव म्हणुन जबाबदारी स्विकारल्यानंतर संघटनात्मक सक्रियता ही त्यांच्या कामाची पद्धत सारेच पहातात. मध्यप्रदेश प्रभारी असल्याने तेथील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गोपीनाथ गडावर 03 जुनला येवुन त्यांच्याविषयी केलेलं भाष्य आमची छाती फुगवणारं ठरलं. एक दिवस निश्चितच पंकजाताईचा राजकारणात आल्याशिवाय रहाणार नाही. शुद्ध कर्माचे हे नेतृत्व ज्यांना फळाची अपेक्षा न करता काम करत रहाणं त्याहुन अधिक लोकांच्या भल्यासाठी रात्रंदिवस कठोर परिश्रम करणं त्यांचा स्वभाव मायाळु, दयाळु आणि आपलेपणाचा आहे. बोलण्यातला स्पष्टपणा अनेकदा कडवट वाटला तरीही इतर पुढार्‍याप्रमाणे नाटकं करत राजकारण करण्याची सवय त्यांना मुळीच नाही. त्यांच्या बोलण्यात प्रामाणिकपणाची शुद्धता जास्तीची असते. बाकी काही असलं तरी बीड जिल्ह्याला त्यांचं नेतृत्व काळाची गरज आहे. भविष्यात पुन्हा एकदा पालकमंत्री म्हणुन त्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व करायला हवं हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना.

राजेंद्र मस्के,
जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, बीड

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा