घातवार.. मांजरसुंभा-पाटोदा राज्य महामार्गावर पुन्हा अपघात एक  जागीच ठार




घातवार.. मांजरसुंभा-पाटोदा राज्य महामार्गावर पुन्हा अपघात एक  जागीच ठार

बीड :  मांजरसुंभा ते पाटोदा राज्य महामार्ग क्रमांक ५४८ -डी वर ससेवाडी फाट्यावर मोटारसायकल स्वार मुकींद पवार रा. हिंगणी हवेली तालुक्यातील.गेवराई जि.बीड हे पाटोदा येथुन होंडा मोटारसायकल (क्रमांक एमएच.एच.-४२ ए.डी.९६६५) गावी जात असताना ससेवाडी फाट्यावर कंटेनर (क्रमांक एम.एच.४६ बीड.बी.४६८)ड्रायव्हर सुनिल लक्ष्मण नाकाडे रा.जाटदेवळा ता.पाथर्डी जि.अहमदनगर मांजरसुंभाकडुन पाटोद्याकडे जात असताना आज दिनांक १४ ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळी ६ वाजता अपघात होऊन अपघातात मुकींद पवार जागीच ठार झाले. नेकनुर पोलीस व मांजरसुंभा महामार्ग पोलीस प्रशासन यांनी स्थळ पंचनामा केला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा