जि प कन्या पिंपळनेर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.




जि प कन्या पिंपळनेर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
पिंपळनेर l दिनांक 3 जानेवारी रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जी प कन्याप्रशाला पिंपळनेर येथे उत्साहात साजरी करण्यात आली .
सावित्रीबाई जोतीराव फुले  या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते.  महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.
या दोघांनी इ.स.१८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. अशी माहिती मुलींनी आपल्या भाषणातून दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीप डावकर सर यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व , मुलींच्या शिक्षणासाठी समाजाचा होणारा विरोध व त्यावेळेस सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेला संयम यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्रीमती सुषमा भोले मॅडम यांनी केले तर सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास ओवीच्या माध्यमातून श्रीमती अंबिका बगाडे मॅडम यांनी सादर केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती सविता चव्हाण मॅडम यांनी स्त्रियांच्या दुःखाचे मूळ कारण त्यांच्या अज्ञानामध्ये आहे .हे सावित्रीबाईंनी ओळखून मुलींना ज्ञान प्रवाहात आणण्यासाठी कशाप्रकारे कार्य केले हे मुलींना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री जाधव सर यांनी केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा