शिवशारदा पब्लिक स्कूलमध्ये गणपतीची मुर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न, चित्रकार उद्देश पघळ यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन




शिवशारदा पब्लिक स्कूलमध्ये गणपतीची मुर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न,
चित्रकार उद्देश पघळ यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
===========
गेवराई दि.२४(प्रतिनिधी) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिव शारदा पब्लिक स्कूल, शिवाजीनगर गढी येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्राचार्य एन. पी. दत्ता यांच्या अध्यक्षतेखाली इको फ्रेंडली शाडू मातीपासून गणपती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चित्रकार तथा वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया मध्ये नोंद असणारे उद्देश पघळ यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन शाळेचे सहशिक्षक सुनील चाळक व हिंदी विभागाच्या प्रमुख सुवर्णा मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. चित्रकार उद्देश पघळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर गणेशाच्या मुर्त्या बनवल्या. त्यांनी कार्यशाळेबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी इयत्ता ३ री ते ९ वी पर्यंत विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेसाठी सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा