मराठवाडा चेबर आँफ ट्रेड अँड काँमर्स कार्याकारणीवर माजलगावचे दोन सदस्यांची निवड




मराठवाडा चेबर आँफ ट्रेड अँड काँमर्स कार्याकारणीवर माजलगावचे दोन सदस्यांची निव
माजलगाव l
महाराष्ट्र चेबर आँफ काँमर्स च्या मराठवाड्याच्या कार्यकारिणीवर  माजलगावातील सदस्यांना स्थान प्राप्त झाले असुन मराठवाडा चेंबर आँफ ट्रेड अँड काँमर्स च्या उपाध्यक्षपदी जेष्ठ किराणा व्यापारी धनराज बंब तर सचिवपदी कापडा संघटनेचे अध्यक्ष शशिकिरण गडम यांची निवड झाली आहे.
   मराठवाडा चेंबर आँफ ट्रेड अँड काँमर्स ची बैठक औरंगाबाद (संभाजीनगर) मध्ये महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार व मराठवाडा चेंबर आँफ ट्रेड काँमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी
अध्यक्षेत पार पडली या बैठकीत मराठवाडा चेबर आँफ ट्रेड अँड काँमर्स च्या नुतन अध्यक्षपदी आदेश पालसिंग छाबडा औरंगाबाद तर महासचिवपदि जगन्नाथ काळे औरंगाबाद यांची निवड झाली या बैठकीत मराठवाड्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
 या बैठकीत मराठवाडा पदाधिकारी कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली.माजलगाव व्यापारी महासंघाचे कार्याची दखल घेऊन
माजलगाव येथील मराठवाडा स्थरिय मेळावा असु वा माजलगाव महासंघाच्या मालकीची कार्यालय व इतर संपूर्ण कार्याची पावती म्हणून माजलगाच्या दोन सदस्यांना संधी प्राप्त झाली.
या निवडीत माजलगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्षांचे चातुर्यचे कुशल नेतृत्वाचे सर्वच स्थरातुन कैव्वतु होत आहे या निवडीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.माजलगाव तालुका व्यापारी महासंघाच्या सर्व पदाधिकार्यांनी विशेष सहकार्य लाभले.यात बाजार समिती व्यापारी संचालक प्रभाकर होके,महासचिव सुनील भांडेकर,उपाध्यक्ष जफर मिर्झा,रामेश्वर टवानी,गोविंद बजाज,संतोष अब्बाड,संजय कोकड,नारायण सातपुते,शेख सल्लाउदिन,मोहन घुले,विवेक बजाज,रियाज काजी,व गणेश लोहिया यांनी विशेष प्रयत्न केले.
या निवडी बदल संपूर्ण मराठवाड्यातील पदाधिकारी व  व्यापारी बांधवांनी शुभेच्छा दिल्या.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा