केवळ कोमट पाण्याच्या सेवनाने खरंच belly fat कमी होत का? जाणून घ्या सत्य




अनेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने खूप त्रस्त असतात. यावर मात करण्यासाठी आपण जीममध्ये घाम गाळणं, विविध प्रकारच्या सप्लिमेंट्स घेणं, आहारावर नियंत्रण ठेवणं आणि जीवनशैलीतही अनेक बदल करणं असे सर्वतोपरी प्रयत्न करतो.
दरम्यान काहींना याचे रिझल्ट्स मिळतात तर काहींना नाही. आज आम्‍ही तुम्‍हाला एकच उपाय करण्‍यास सांगणार आहोत जेणेकरुन तुम्‍ही तुमच्‍या वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवू शकाल.

वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता. यामध्ये ना मेहनत आहे ना खर्च आहे.

एका संशोधनातून हे समोर आलंय की कोमट पाण्याच्या सेवनाने थर्मोजेनिक प्रभावामुळे चयापचय गती वाढते. त्यामुळे ऊर्जेचा वापर जास्त होतो. त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.

शरीराला हायड्रेट ठेवते

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याचं सेवन आवश्यक आहे. यामुळे शरीरातील प्रत्येक पेशीला पोषक तत्वं मिळतात आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते.

भूक कमी होते

कोमट पाण्याचे सेवन भूक कमी करते, त्यामुळे अनावश्यक भूक शांत करण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचं सेवन केलं पाहिजे.

कॅलरीजचं प्रमाण

पाण्यामध्ये कोणत्याची प्रकारच्या कॅलरीज नसतात. त्यामुळे पाण्याच्या सेवनाने वजन वाढीची समस्या उद्भवत नाही.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा