जिल्हा रुग्णालय ६४ रुग्णांवर यशस्वी दंत शस्त्रक्रिया व उपचार




  • जिल्हा रुग्णालय ६४ रुग्णांवर यशस्वी दंत शस्त्रक्रिया व उपचार
    ————————————————–

  •  बीड  मराठवाडा पत्र न्यूज   दि २८
    सार्बजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रासह बीड जिल्हयात शारदीय नवरात्री उत्सवाहाचे औचित्य साधून दिनांक २६ सोमवार पासून १८ वर्षावरील सर्व महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी माता सूरक्षित तर पर सुरक्षित हे अभियान राबविले जात आहे. त्याअनुषंगाने जिल्हा रुग्णालय, बीड येथे दंतरोग चिकित्सा व उपचार शिबीरामध्ये काल दिनांक २८रोजी एकूण ७९ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यामधील ६४ रुग्णांवर रूट कॅनल- २, कुत्रीम कवळी बसवणे ०१. दात काढणे-३९, शस्त्रक्रियेव्दारे अक्कलदाढ काढणे ०४ दातामध्ये सिमेंट भरणे- ११, दात स्वच्छ करणे ०७ इत्यादीवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले.

  • सदर दंतरोग चिकित्सा शिबीरामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयातील दंतचिकित्सक डॉ. अमोल बनसोडे, डॉ. प्रिया मुंडे, डॉ. प्रियंका तांदळे, डॉ. रेश्मा मुरकूटे, डॉ. सायली पाटील, डॉ. कमलाकषी काकडे, डॉ. अश्विनी सुतार व कर्मचारी श्रीमती नखाते यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली व दंतरोग चिकित्सा आरोग्या बाबत समुदेशन केले. तसेच जिल्हयातील जास्तीत जास्त महिला व १८ वर्षावरील किशोरवयीन मुली व इतर रुग्णांनी या दंतरोग शिबीराचा लाभ घेण्याचे अहवान केले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा