सुंदरराव सोळंके महाविद्यालयात परिसर मुलाखतीतून आठ विदयार्थ्यांना मिळाली नोकरी 




सुंदरराव सोळंके महाविद्यालयात परिसर मुलाखतीतून आठ विदयार्थ्यांना मिळाली नोकरी
 माजलगाव : ( प्रतिनिधी ) –
     सुंदरराव सोळंके महाविद्यालयात परिसर मुलाखती (कॅम्पस इंटरव्ह्यू)घेऊन याद्वारे आठ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड  येथे क्लर्क, मार्केटिंग ऑफिसर  व कॅशियर या पदांसाठी नोकरी करण्याची संधी मिळाली आहे.
     म.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, सरचिटणीस आ. सतीश चव्हाण तसेच महाविद्यालयीन विकास समिती प्रमुख ऍड भानुदासराव डक यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदराराव सोळंके महाविद्यालयात छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड यांच्यामार्फत क्लार्क, मार्केटिंग ऑफिसर  व कॅशियर या पदांसाठी परिसर मुलाखती दि. 23 व दि 25 नोव्हेंबर  रोजी  दोन फेरीत घेण्यात आल्या. यामध्ये महाविद्यालयातील  22 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातील आठ विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून निवड करण्यात आली. परिसर मुलाखती घेण्यासाठी प्राचार्य डॉ. जी. के. सानप व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. श्रीनिवास मोतेकर यांचे सहकार्य होते.
 सुंदराराव सोळंके महाविद्यालयात यापूर्वीही परिसर मुलाखती घेऊन अनेक तरुणांना विविध नामांकित कंपनीमध्ये नोकरीच्या संध्या उपलब्ध करून दिल्या आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना के. का. सदस्य विजय सोळंके, ऍड भानुदासराव डक, प्राचार्य डॉ जी. के.  सानप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा