तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात ?




तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात
वडवणी प्रतिनिधी
पालकांनो आपल्याला कोणताही त्रास झाला की आपण डॉक्टरांकडे जातो,आपण आपल्या मुलांना  काही शारीरिक त्रास उद्भवला तर लगेच डॉक्टरांकडे म्हणजेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो परंतु मुलांच्या मना ला कितपत समजून घेतो त्यांच्या भावना समजून घेतो का, मुलांच्या भावना सतत दुखावत आहेत का, त्यांना आपण सतत सूचना देत आहात का,असं जर होत असेल तर मनाचं काय ?दिवसभरामध्ये तुमच्या सूचना कशा असतात त्यामुळे नकारात्मक विचार येऊन मन आजारी पडतं आहे, त्यामुळे त्यांच्या कृती सुद्धा तशाच आहेत याचा विचार करणे पालकांनी गरजेचा आहे तुमचा कोणताही एक मुख्य विचार पूर्ण होण्यासाठी विश्वातील अनेक समान विचार एकत्र येतात व तुमचा मुख्य विचार पूर्ण होतो त्यामुळे तुमची तुमच्याबद्दल तसेच तुमच्या मुलाबद्दल विचार कसे आहेत हे तपासणे गरजेचे आहे.
 तू मूर्ख आहेस, तू नालायक आहेस ,तू अभ्यास करत नाहीस,गाढवा आहेस, चल उठ हे काम कर, तू गधा आहेस, तुला काहीच कळत नाही, तो शेजारचा करण बघ किती चांगला आहे, तुम्ही तुमच्या मुलाला अश्या वारंवार मिळणाऱ्या प्रत्येक प्रक्रियामुळे ते मुल स्वतः ला त्या भूमिकेमध्ये समजतात मला कमी मार्क मिळतात माझ्याकडून चांगला अभ्यास होत नाही मी नेहमी चुकतो मी वेडा आहे मी मूर्ख आहे मी नालायक आहे असा विचार मुल करत असतो यामुळे मुलांच्या प्रगतीवर,व्यक्तिमत्वावर खूप मोठा परिणाम पडतो. म्हणजेच पालक मुलांच्या मेंदूला नकारार्थी सूचना अधिक प्रमाणात देतात,यामुळे पालकांनी विविध प्रसंगांमध्ये मुलांशी कशी प्रतिक्रिया द्यावी याचा विचार करणे खूप गरजेचे आहे.
 आपण मोठ्या असून आपण पण चुकतो, आपण पण दारू पितो, आपण पण सिगारेट ओढतो, आपण अशा एक ना अनेक चुका करतो मग आपलं काय, याचा विचार करणे पण खूप गरजेचे आहे मग चुकायचं कोणी मुलांनी की आपण मूल चुकलं पण ते का चुकलं त्याच्या कोणत्या भावना दुखावल्या आपण हे कधी समजून घेतो का, त्याच्या व्यक्ती महत्त्वाची गुणदोषाची यादी काढायला बसलो तर यादी अधिकच लांबलचक बनेल परंतु येथे प्रत्येक पालकांनी हाच विचार करावा लागेल की मुलांना स्वतःचे गुणदोष दोष ओळखण्याची आणि त्यावर काम करण्याची जाणीव जागृती झालेली नसते त्यामुळे पालकांनी मुलांमध्ये फक्त गुणाची वाढ व्हावी म्हणून मुलांसमोर फक्त गुणच घेऊन जावेत तसेच मुलांच्या दोषावर सुद्धा पालकांनी काम करावे जेणेकरून तुमचा मुलगा सुद्धा एक गुण संपन्न व्यक्तिमत्व बनेल हे वाचायला खूप छान वाटतं पण प्रत्यक्षात मुलांसोबत वागत असताना खूप कठीण जातं त्यासाठी जाणीवपूर्वक वातावरण तयार करावा लागेल जाणीवपूर्वक लहान गोष्टींची सुरुवात प्रसंगी करावी लागेल म्हणूनच बाप होन खूप सोप आहे पण मी निभावणे खूप अवघड आहे अस म्हणतात.
कॉन्सलर- मनीषा बिक्कड
9545440471
मेंदू विज्ञान व मानसशास्त्र आधारित कौन्सलिंग
ब्रेन वे रिसर्च फाउंडेशन
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा