लोकमान्य टिळक महाविद्यालयाची एड्स जनजागरण रॅली संपन्न




लोकमान्य टिळक महाविद्यालयाची एड्स जनजागरण रॅली संपन्
 वडवणी  (प्रतिनिधी)
येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे आज दि. 1 डिसेंबर रोजी एड्स जनजागरण रॅली आयोजित करण्यात आली होती. वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविद्यालयाचे प्राचार्य किसन पवार यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा आरंभ केला. वडवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक कांगुणे साहेब यांनी उपस्थित राहून  शुभेच्छा दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रॅलीचे समारोप करण्यात आले. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी एड्स जागृतीच्या घोषणा उस्फूर्तपणे दिल्या.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ अशोक खेत्री, डॉ गोविंद पांडव, डॉ मनिषा ससाने, महाविद्यालयाचे प्राध्यापक गोपाळ मस्के, गोपीचंद घायतिडक, अंकुश पवार, नागनाथ साळुंके, आत्माराम पवार, इत्यादींनी   परिश्रम घेतले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा