” मला न विचारता माहेरी का आलीस ” म्हणून पतीने पत्नीचा केला खून !




” मला न विचारता माहेरी का आलीस ” पतीने पत्नीला जम्ब्याने मारले नेकनुर पो.स्टे अंतर्गत बोरखेड येथील गुन्हा ज्यामध्ये पतीने पत्नीला जागीच मारुन टाकले.

आरोपीस जन्मठेपेची शिक्षा….!
दिनांक १०/१०/२०२० रोजी फिर्यादीने फिर्याद दिली की तीची मूलगी नगीणा हिचे ९ वर्षापुर्वी आरोपी बरोबर लग्न झाले होते आरोपी शहाजी व मयत नगीना यांचे नेहमी कुरबुरीचे किरकोळ भांडन होत असे म्हणून मयत नगीना ही दिनांक ८/१०/२०२० रोजी माहेरी निघून आली त्यानंतर दोन दिवसांनी आरोपी दुपारी 3 वाजता नगीणाच्या माहेरी आला व म्हणाला की तू मला न विचारता माहेरी निघून का आलीस असे म्हणून आरोपीने त्याच्या कंबरेला असलेला जंबीचा हातात धरून नगीनाचे छाती कंबरेवर कानावर व अंगावर सपासपा वार केले त्यामध्ये नगीना जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडली तीला तशा अवस्थेमध्ये सरकारी दवाखान्यात नेले असता ऍक्टरानी तीला जागेवरच मृत्यू घोषीत केले सदरचे प्रकरण अप्पर जिल्हा सत्र न्यायाधिश सुरेखा पाटील मॅडमनी यांनी सदर आरोपी शहाजी शहात्तर काळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली या प्रकरणात फिर्यादीचे सरकारी वकील अड अनील धसे यांनी काम पाहीले, याप्रकरणात एकून साक्षीदार १४ तपासले त्यामध्ये स.पो नि भारत बलैया एस. एस .आय गोडे , जमादार परमेश्वर तसेच, तसेच कोर्ट ड्युटी पी एस आय बी बी जायभाय यानी सहकार्य केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा