पालीच्या धरणात आढळला मृतदेह




पालीच्या धरणात अखेर आढळला मृतदेह

मागील तीन दिवसांपासून होता बेपत्ता.

नेकनूर – दि १० रामनाथ घोडके

बीड तालुक्यातील पाली येथील धरणाच्या काठी पँट , आधार कार्ड , घड्याळ व ७५ रुपये ठेवून गायब झालेल्या केशव भिकाजी काशीद वय २९ रा. नेकनूर हल्ली मू बार्शी नाका , अशोकनगर , बीड ) याचा ८तारखे पासून शोध लागलेला नव्हता . आज अखेर त्याचा मृतदेह पाली च्या धरणात नेकनूर ग्रामस्थांना पाहणी करते वेळेस आढळून आला आहे.

केशव काशीद हा मूळचा नेकनूर येथील असून बीडमध्ये मामाकडे राहतो . ७ फेब्रुवारीला मामा व त्यांचे कुटुंबीय हैदराबादला गेले . त्यानंतर केशव कोठे गेला , त्याचे काय झाले , याचे रहस्य कायम आहे . ८ फेब्रुवारी रोजी पाली येथील तलावाच्या काठी त्याची पँट , त्यात आधार कार्ड , घड्याळ असे साहित्य पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळले होते. त्या नंतर आज नेकनूर ग्रामस्थानी जाऊन शोध घेतला तेव्हा त्यांना केशव चा मृतदेह दिसून आला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा