12वी बोर्डाच्या इंग्रजी पेपर मध्ये चुका




12वी बोर्डाच्या इंग्रजी च्या पेपर मध्ये चुका.
विद्यार्थ्यांना बोनस गुण मिळणार का ?

संभाजीनगर ! (स्वप्नील डावकर )
दि. 21फेब्रुवारी पासून 12वी बोर्डाच्या परीक्षेस सुरुवात झाली असून पहिला पेपर हा इंग्रजी विषयाचा होता. या पेपर मध्ये ज्या छापील चुका बोर्डा कडून झाल्या त्या बद्दल विद्यार्थ्यांना मध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात बोर्डाने तात्काळ योग्य तो निर्णय घेऊन तात्काळ खुलासा करावा अशी प्रतिक्रिया पालक व विद्यार्थ्यांमधून येत आहे.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे कि, 21 फेब्रुवारी रोजी इयत्ता 12वी चा इंग्रजी चा पेपर होता व या पेपर मधील प्रश्न क्रमांक 3 मधील उप प्रश्न A3, A4, व A5 मुळे विद्यार्थ्यांन मध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. प्रश्न क्रमांक 3 मधील A3 व A5 मध्ये प्रश्न नसून सूचना दिलेल्या आहे असे दिसते तर A4 मध्ये प्रश्न ऐवजी उत्तरंच दिलेले आहे असे दिसून येते. हे तीनही प्रश्न 6 मार्कांचे आहेत. त्यामुळे दिवस रात्र एक करून व एक एक मार्कसाठी मेहनत घेऊन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या प्रश्ना विषयी संभ्रम निर्माण होऊन आपले सहा मार्कांचे नुकसान होते कि काय अशी भीती निर्माण झाली आहे. या प्रश्ना चे काय होणार मार्क मिळणार कि नुकसान होणार यामुळे विद्यार्थी चिंतेत असून पहिल्याच पेपर मध्ये गोंधळ उडल्यामुळे पुढच्या पेपर मध्ये काय होणार अश्या विचारात विद्यार्थी अडकले आहेत. त्यामुळे बोर्डाची नाचक्की झाली असून या पेपर मधील 6 मार्क संदर्भात बोर्डाने तात्काळ निर्णय घेऊन लवकरात लवकर खुलासा करावा अशी प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रामधून येत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा