शिक्षणातील जिल्ह्याच्या पॅटर्नच्या माेहात न गुरफटता, काेणत्येही क्लासेस न लावता बीडमध्येच श्रृष्टी लाेळगे बनली डाॅक्टर; काेव्हीडमुळे वेळ गेला, चाैथे वर्ष झाले दीड वर्षाचे




शिक्षणातील जिल्ह्याच्या पॅटर्नच्या माेहात न गुरफटता, काेणत्येही क्लासेस न लावता
बीडमध्येच श्रृष्टी लाेळगे बनली डाॅक्टर; काेव्हीडमुळे वेळ गेला, चाैथे वर्ष झाले दीड वर्षाचे

बालवाडीपासून ते बारावीपर्यंतचे मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या श्रृष्टी लाेळगे हिने इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम सतत वाचनातून केला साेपा

बीड

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये सुविधा नाहीत, महाविद्यालयांची कमतरता या ना त्या अनेक समस्यांमध्ये बीड जिल्ह्यातील विद्यार्थी-पालकांकडून चर्चा हाेत असते तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध जिल्ह्याच्या पॅटर्नची यादी डाेळ्यासमाेर उभे राहते. बालवाडीपासून ते बारावीपर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या श्रृष्टी लाेळगे हिने मनाचा ठाम निश्चय करत बीड जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रातील बी. एच. एम. एस. चे शिक्षण करण्याचे ठरवले. पहिल्या वर्षात इंंग्रजी माध्यम समजणे कठीण गेले मात्र सतत वचनाच्या सरावातून अभ्यास साेपा करुन घेतला. क्लासेस न लावता राहत्या घरातच सात ते नऊ तास अभ्यास तर परिक्षेच्या तीन महिने अधीपासून तयारी करत झाेप येऊ नये म्हणून एक वेळ जेवन करुन ११ ते १३ तास अभ्यास करुन साडेचार वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या अंतीप परीक्षेत यश संपादन करुन श्रृष्टी लाेळगे ही डाॅक्टर बनली आहे.

बीड शहरातील सोनार समाजातील शुभम ज्वेलर्स चे संचालक दिनेश लोळगे यांची कनिष्ठ कन्या श्रृष्टी ही लोळगे परिवारातील पहिली डाॅक्टर मुलगी आहे. तिचे प्राथमिक शिक्षण संस्कार विद्यालयांमध्ये तर माध्यमिक शिक्षण हे महाराष्ट्र पब्लिक स्कूल औरंगाबाद येथे पूर्ण केले आहे. अकरावी व बारावी सायन्स श्रृष्टीने बीड शहरातील केएसके महाविद्यालयात पूर्ण केले.
डाॅ. श्रृष्टी म्हणते, बारावी ची परिक्षा दिल्याने पुढे काय ? करीअर निवडण्याची पहिली पायरी म्हणून ताे काळ असताे. उच्च शिक्षणासाठी पुढील चांगले महाविद्यालय, जिल्हा चांगला निवडावा लागताे एकूणच पालकावर्गात हा विषय गांभीर्याने घेतला जाताे. माझ्याही कुटूंबातही फार चर्चा झाली. त्यावेळी वैद्यकीय शिक्षणासाठी सीईटी हाेती तसेच नव्यानेच महाराष्ट्र राज्य शासनाने नीट देखील लागू केली हाेती. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील बी. एच. एम. एस. चे शिक्षण मिळवण्यासाठी मी सीईटी आणि नीट दाेन्ही परीक्षा दिल्या हाेत्या. त्यातही यश मिळाले. बीड शहरामधील नवगण संस्थेच्या सोनाजीराव क्षीरसागर होमोपॅथीक मेडीकल कॉलेज बीड येथेच शिक्षणासाठी प्रवेश घेतला. शिक्षण क्षेत्रातही बीड पॅटर्न काही कमी नाही हे ठळकपणे दाखवण्यासाठी अभ्यासाला प्रारंभ केला. महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक-प्राचार्य यांच्याकडून दिले जाणारे ज्ञानदान तसेच प्रात्यक्षीकांवर अधिकप्रमाणात दिले जाणारे लक्ष हे मला वैयक्तीकपणे डाॅक्टर हाेण्यासाठी महत्वाचे ठरले आहे. अंतीम वर्षाची परिक्षा दिल्यानंतर १४ मार्च २०२३ राेजी निकाल जाहिर झाला यात १५०० पैकी ९०७ गुण प्राप्त झाले. बीडमध्येही वैद्यकीय शिक्षण दर्जेदार मिळवून येथील रुग्णांची सेवा करण्याचा मानसही डाॅ. श्रृष्टी दिनेश लाेळगे हिने व्यक्त केला आहे.
——
मराठी असाे वा इंग्रजी माध्यम अभ्यास गरजेचाच
आमच्या कुटूंबात मी माेठी मुलगी आहे. माझे १२ वी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. निश्चय केला तर शिक्षाणासाठी माध्यम हा गंभीर विषय नसताे. अभ्यासात सातत्य व मेहनत अवश्यक असते तेही क्लासेस न लावता स्वत:च्या राहत्या घरामध्ये करणंही शक्य आहे. ग्रामीण भागातील मुलांनी स्वत:वर आणि अभ्यासावर विश्वस ठेवावा, यश आपली प्रतिक्षा करते हाच संदेश महत्वाचा.
– डाॅ. श्रृष्टी दिनेश लाेळगे, बीड.
—–
मुलांमधील गुण ओळूख शिक्षण द्यावेत
आपले मुलांनी काय बनणं पाहिजे त्यासंदर्भात पालक म्हणून प्रचंड अपेक्षा असतात. मात्र ते मुलांवर ओझे हाेणार नाही ना याचेही निरीक्षण पालकांनी करणं अवश्यक आहे. मुलांमधील गुण ओळखून त्यात करीअर करण्यसाठी संधी दिली तर अधिक जलद गतीने हाेणरे चांगले बदल दिसून येतील. नवगण संस्थेच्या सोनाजीराव क्षीरसागर होमोपॅथीक मेडीकल कॉलेजमधील प्राचार्य, प्राध्यापकांनी श्रृष्टीच्या यशाबद्दल अभिनंदन केले. मुलगी डाॅक्टर झाल्याचा मनस्वी आनंद झाला.
– दिनेश लाेळगे, वडील, शुभम ज्वेलर्स, बीड.
—–
आपल्या जिल्ह्याची ऐळख उंचवणं हा अभिमान
बीड जिल्ह्याची ओळख ही चांगली आहे. काही अपवादात्म चर्चा हाेत असेल मात्र शिक्षणाचाही पॅटर्न हाेऊ शकताे हे बीड जिल्ह्यानं ठरवल तर कठीण नाही. हे करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी येथील शिक्षण संस्थांमध्ये अभ्यासच्या बळावर करुन दाखवता येते. हेच माझ्या नातीनं यशस्वीपणे सिध्द केले आहे. सोनाजीराव क्षीरसागर होमोपॅथीक मेडीकल महाविद्यालयातही दर्जेदार शिक्षण घेऊन श्रृष्टी डाॅक्टर झाली आहे. वैद्यकीय शिक्षातही बीडचा पॅटर्न बनून आपल्या जिल्ह्याची ओळख उंचवणं हा अभिमान आहे.
– भारत लाेळगे, ज्येष्ठ संगीत विशारद, बीड.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा