राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी मूळगावी अंत्यसंस्कार होणार पार्थिव हिंगोलीकडे रवाना




राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी मूळगावी अंत्यसंस्कार होणार
पार्थिव हिंगोलीकडे रवाना

Daily marathwada patra Team

पुणे : काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव यांचे आज पहाटे कोरोनामुळे निधन झाले आहे. उद्या म्हणजे सोमवारी हिंगोलीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी त्यांचे पार्थिव हिंगोलीत आणण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली आहे.

राजीव सातव यांचे आज पहाटे 4 वाजून 58 मिनिटांनी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेली त्यांची कोरोना विरुद्धची झुंज आज अखेर संपली. उद्या सोमवारी सकाळी 10 वाजता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिलीये. सातव यांचे पार्थिव पुण्याहून हिंगोलीकडे रवाना झाले आहे. रुग्णवाहिकेत सातव यांची आई, पत्नी आणि इतर अप्तेष्ट आहेत. उद्या सकाळी कळमनुरीमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितलेय.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा