20 लाखलाला गांडवलें ! थेट आरबीआय’च्या प्रिटींग प्रेसमधून नोटा देण्याच्या बहाण्याने अर्बन निधीच्या मॅनेजरला चुना!




बीड

खर्‍या नोटांच्या बदल्यात आरबीआय’च्या नाशिक येथील छापखान्यात अतिरिक्त छापलेल्या नोटा पाचपटीने अधिक देण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी बीडमधील एका निधी बँकेच्या मॅनेजरला चांगलाच गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. अधिक रकमेच्या मोहापायी त्या मॅनेजरने 20 लाख रुपये गमावले आहेत. याप्रकरणी तीन भामट्यांवर पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोरख आसाराम भटे (रा.स्वराज्यनगर, बीड) असे या बँक मॅनेजरचे नाव आहे. त्यांना 16 जून रोजी सायंकाळी एका अनोळखी मोबाईलवर कॉल आला. मी आरबीआय बँकेचे फंडिंगचे काम करत असून माझा मावस भाऊ नोटा छापण्याच्या कारखान्यात आहे. त्यांच्या मार्फत माझी लिंक असून तुम्हाला खर्‍या नोटांच्या बदल्यात त्या कारखान्यात अतिरक्त छापलेल्या तिप्पट खोट्या परंतु खर्‍या वाटणार्‍याच नोटा देतो, असे आमिष दाखविले. सुरुवातील गोरख यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, भामट्यांनी सतत फोन करून त्यांना विश्वासात घेतले. त्यानंतर समोरच्या भामट्याने एका माणसाला बीड बायपासला पाठवून त्याच्याजवळ 500 रुपयांच्या 3 व 100 रुपयांच्या 3 अशा नोटा दिल्या. त्यांना चुना लावायला सांगितला आणि नोटांचा रंग बदलून दाखवला. त्यानंतर त्याच नोटा बँकेत भरून खात्री करण्यासह सांगितले. त्याप्रमाणे यांनी बँकेत नोटा भरल्यावर कोणालाही ओळखायला आले नाही. त्यामुळे गोरख यांचा विश्वास पक्का झाला. त्यानंतर 20 लाख रुपयांच्या बदल्यात भामट्यांनी एक कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले. गोरख यांनी कापूस विक्री करून व मित्रांकडून उसने घेऊन कसेबसे 20 लाख रुपये जमवले. ती रक्कम घेऊन भामट्यांनी त्यांना उस्मानाबादला बोलावले. तिथे विविध ठिकाणी त्यांना घुमावले. नंतर स्वत: येऊन न भेटता एका माणसाला पाठवून खर्‍या पैशांची बॅग घेऊन खोटे पैसे देऊन धूम ठोकली. त्यानंतर गोरख यांना तत्काळ तेथून निघून जाण्यास सांगितले. तो गेल्यानंतर गोरख यांनी बॅग उघडली असता त्यात पैशांऐवजी कोर्‍या वह्या असल्याचे दिसले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गोरख भटे यांनी पोलिसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून तीन भामट्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा