कु.शिवन्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा




बाल-गोपाळांना मिष्ठान्न देवून कु.शिवन्या गोविंद शिराळे हिचा द्वितीय वाढदिवस साजरा

बीड ।
भाजपाचे सचिव तथा माजी न.प.सभापती नवनाथआण्णा शिराळे यांची नात व अ‍ॅड.सोनम व अ‍ॅड.गोविंद शिराळे यांची सूकन्या कु.शिवन्या हिचा द्वितीय वाढदिवस कोणताही गाजावाजा, व्यर्थ खर्च टाळून विविध समाजोपयोगी उपक्रमाने बीड शहरातील विवेकानंद निवासी गुरुकुल येथे ग्रामीण भागातील शिकत असलेल्या बाल-गोपाळांना व शालेय विद्यार्थ्यांना विविध पदार्थांचे मिष्ठान्न देवून अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी बाल-गोपाळांचा आनंद द्विगुणित झाला होता. यावेळी समस्त बालकांनी कु.शिवन्या हिला दिर्घायुष्य लाभण्याकरीता विशेष गीत गावून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कु.शिवन्या हिच्या वाढदिवसाला उपस्थिती लावून शुभाशिर्वाद व शुभेच्छा दिल्या. यावेळी वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर, पत्रकार, शिक्षक, प्राध्यापक, व्यापारी, शांतीनिकेतन निवासी गुरुकुलातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक व कर्मचारीवृंद यासह जिजाऊ नगर, स्वराज्य नगर, सावता नगर, तिरुपती नगर, शिवाजी नगर, सोमेश्वर नगर, शिवाजी धांडे नगर, शिराळे नगर यासह बीड शहरातील मान्यवर, नातेवाईक, आप्तेष्ट, नागरीक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत भाजपाचे ज्येष्ठ नेते नवनाथआण्णा शिराळे, रुक्मिणी शिराळे, गोरखआबा शिराळे, मालिनी शिराळे, अ‍ॅड.सोनम गोविंद शिराळे, श्रावणी कृष्णा शिराळे, अक्षय शिराळे, बलराम शिराळे, गणेश शिराळे यांनी केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा