वाहनाच्या लिलावातून ११ लाखाचा महसूल केला शासन खाती जमा




वाहनाच्या लिलावातून ११ लाखाचा महसूल केला शासन खाती जमा
पो.नि.राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्याचे आगळे-वेगळे कार्य
बीड दि.6 (प्रतिनिधी):
बीड जिल्ह्यातील विविध गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केलेल्या सुमारे १०९ वाहनांचा लिलाव शासकीत नियमाप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करुन सुमारे ११ लाख १५ हजार, ५०० रुयाचा महसूल शासन खाती जमा झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी वाहन लिलावाच्या अनेक वर्षांपासूनची रखडत पडलेली प्रक्रिया पूर्ण केली.
यासंदर्भात माहिती अशी की, गेल्या अनेक वर्षपासून पोलीस मुख्यालयावर चोरीच्या गुन्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील अनेक गुन्ह्यातील वाहने लिलाव अभावी पडून होती. सदर लिलावासाठी शासन नियमानुसार जाहिरात प्रक्रिया पूर्ण करावी लागते. सदर अवघड प्रक्रिया पोलिस निरीक्षक केतन राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण केली. १०९ वाहनाच्या लिलावातून सुमारे १५ लाखाचा महसूल शासन खाती जमा झाला. अनेक वर्षांपासून पडून असलेल्या वाहनाचा लिलाव केल्यामुळे पो. नि. राठोड, पी.वाय. बोंबाले आणि त्यांच्या सहकाऱ्याचे अभिनंदन करण्यात आले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा