बाजीराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे मिळाले तब्बल दहा रुग्णांना सहा लाख चाळीस हजाराची रूपयांची मदत




आठ दिवसात मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने तर बाजीराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे मिळाले तब्बल दहा रुग्णांना सहा लाख चाळीस हजाराची रूपयांची मदत

रुग्णांनी लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,कक्षप्रमुख मंगेशजी चिवटे युवा उद्योजक बाजीराव चव्हाण यांचे मानले आभार

बीड : ग्रामीण भागातील नागरिकांच्या लोकप्रतिनिधिंकडून काय अपेक्षा असतात? गावातील सुखसुविधा, आरोग्य, शासनाच्या सुविधा, योजना थेट त्यांच्यापर्यंत आवश्यकतेनुसार तात्काळ पोहचाव्यात आशा असतात आणि शासनाच्या योजना पोहोचवणारे लोक तितके तत्पर असले पाहिजेत जेणेकरून योजनांचा लाभ वेळेत नागरिकांना मिळावा.
त्याच धर्तीवर सध्या महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेला दिल्या जाणाऱ्या योजनांची पूर्तता तत्परतेने केली जात आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिह्यात शिवसेना वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत पुरवली जात आहे.
त्याच माध्यमातून बीड जिल्ह्यातील गोरगरिब रुग्णांना मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू बाजीराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे शिवसेना वैद्यकीय सहायता निधीतुन मोठ्याप्रमाणावर ग्रामीण भागातील गरजू रुगांना मदत मिळत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

शिवसेना वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे हे कार्यतत्पर असल्याने त्यांची या पदावर नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी तात्काळ मदत मिळण्यास सुरुवात झाली, त्यामुळे सर्व स्तरातून मंगेश चिवटे यांचे आभार व्यक्त केले जात आहे.

शिवाय बीड जिल्ह्यातील गरजू रूग्णांना कोणताही विलंब न लागता तत्काळ मदत मिळवी या मुख्य उद्देशाने युवा उद्योजक बाजीराव चव्हाण यांनी बीड जिल्ह्यामध्ये शिवसेना वैद्यकीय सहायता निधी कक्ष उभारला असून बीड जिल्ह्याचं काम पाहण्यासाठी स्वातंत्र एका व्यक्तीची नियुक्ती केली असल्याने गरजू रुगांना तत्काळ मदत मिळत आहे.

आत्तापर्यंत मदत मिळालेल्या काही रुग्णाचे नावे
खालीलप्रमाणे आहेत
नाव मिळालेली मदत
1)यशराज विष्णू पवार ,रा.गेवराई 50000/-

2)कल्पना रोहित कदम
रा.पाटोदा,बीड 50000/-

3)निर्मला देवराव भिसे
रा.हदगाव नांदेड 100000/-

4)हूमेरा सलमान शेख
रा. बीड 50000/-

5)पंचफुला बाजीराव रुपनर
रा. आहेर चिंचोली,बीड 100000/-

6)हनुमंत आबा मोहिते
रा. मनकर्ण सातारा 20000/-

7)विजय सदाशिव जाधव
रा. बीड 70000/-

8)जागृती मारुती काळे
रा.गोळेगाव,गेवराई 50000/-

9)अलका हरिदास शिंदे
रा. केज,बीड 100000/-

10)मालन अर्जुन मायकर
रा. गेवराई,बीड 50000/-

अशा एकूण दहा पेशंटला मिळाली तब्बल सहा लाख चाळीस हजार रुपयांची मदत

आत्तापर्यंत आशा अनेक गरजू रुगांना बाजीराव चव्हाण यांच्या माध्यमातून मदत मिळने शक्य झाले आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील नागरिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बाजीराव चव्हाण यांचे आभार मानत आहेत, खरंतर बाजीराव चव्हाण यांना संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करून ते गोरगरीब लोकांना वाटण्याचं काम बाजीराव चव्हाण करत आहेत त्यामुळे बाजीराव चव्हाण हे एकप्रकारे बीड जिल्ह्याचे आरोग्यदूत आहेत असं म्हंटलं तरी काही वावगं ठरणार नाही.

बाजीराव चव्हाण यांच्या बीड येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचा पत्ता आणि नियुक्ती केलेल्या व्यक्तीचा संपर्क खालीलप्रमाणे आहे

पत्ता : मुक्ताई बिल्डिंग,मुक्ताई लॉन्स,बार्शी रोड बीड

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा