धारूरच्या कोविड सेंटरचा कारभार रामभरोसे ; तालुक्याचा मृत्युदर वाढला,जनतेचे जिवावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी कोठे लपले ?




धारूरच्या कोविड सेंटरचा कारभार रामभरोसे ; तालुक्याचा मृत्युदर वाढला,जनतेचे जिवावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी कोठे लपले ?

किल्लेधारूर(प्रतिनिधी) शहरातील कोविड सेंटरचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे धारूरच्या कोविड सेंटर कडे लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे अस्वच्छता अँटीजनटेस्ट किटचा तुटवडा ,औषध गोळ्यांचा तुटवडा पाणी समस्या अनागोंदी कारभार यामुळेच धारूर तालुक्यातचा कोरोना मृत्यू दर वाढला आहे . गल्ली ते दिल्ली पासून जनतेचे जिवावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी कुठे लपले ? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत

या कोविड सेंटरचा कारभार परिचारिका व वॉर्डबॉय यांच्यात जीवावर चालत आहे हे 24 तास कोविड सेंटर मध्ये उपलब्ध असतात परंतु नियुक्त केलेले डॉक्टर हे त्या ठिकाणी पूर्ण वेळ थांबत नसल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे .पाणी असून ते वरच्या टाकीत चढत नसल्याने
बाथरूमला पाणी मिळत नाही त्यामुळे कोरोना रुग्न सरास शौचालयात बाहेर जात आहेत बाहेर तुटल्याने शिकले नाही या रस्त्याकडे फिरावयास जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे यांना पण कोरोना ची लागण होऊ शकते

असुविधांमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याने या कोवीड सेंटरचा कारभार पूर्णतः रामभरोसे चालत आहे

किल्ले धारूर शहरामध्ये कोविड सेंटर मध्ये डॉक्टर हे नावालाच आहेत तर सर्व रुग्णाची देखभाल पाहतात परिचारिका आणि वॉर्डबॉय. सकाळी डॉक्टर येतात राऊंड घेऊन जातात नंतर काय साफसफाई पासून ते प्राथमिक तपासणी परिचारिका आणि वॉर्डबॉय बघतात ना कुणाचे भय ना कुणाची भिती कुणीही या आणि कोविड सेंटर मध्ये फिरून जा टिकली मारून जा कोणीही येतय काही करतय ना कुणाचा वचक ना कुणाचा धाक
असे कोविड सेंटर चालते .नातेवाईक तर सर्रास डबा देतात काहीना तर जे पाहिजे ते मिळते त्याची देखील सोय होते

किल्ले धारूर शहरामध्ये कोविड सेंटर मध्ये डॉक्टर हे नावालाच आहेत जातात आणि फक्त राऊंड घेऊन येतात जिम्मेदारी झाली असं म्हणून ते निघून जातात व रुग्णांची सेवेसाठी सेंटर मध्ये राहतात परिचारिका व वार्ड बॉय सर्वस्वी हेच चालवतात नियुक्त केलेल्या डॉक्टरांना दिलेल्या ड्युटीच्या वेळेमध्ये तब्बल ८ ते १२ तास थांबण्याची नियुक्ती असतानाही डॉक्टर थांबत नसतील तर त्यांच्यावर तालुका आरोग्य अधिकारी कारवाई का बर करत नाहीत हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे एखादा पेशंट सिरीयस झाला तर त्याची जिम्मेदारी कोणावर आज या सेंटरमध्ये गोर गरीब ग्रामीण भागातील रुग्ण उपचार घेत आहेत यांच्या आरोग्याची जिम्मेदारी कोणावर असाही प्रश्न उपस्थित होत आहे

कोवीड सेंटर डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे वरिष्ठ अधिकारीही डॉक्टरला काही बोलत नाही हे डॉक्टर सोडून गेले तर दुसरा भेटणार नाही सेंटरची सगळी जिम्मेदारी केवळ नर्स व वार्ड बॉय यांच्यावरच दिसत आहे त्यामध्ये रुग्णाची काय हाल होत असतील ते देव जाणे अशा समस्यांना पाहायला कोणीच नाही धारूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी तर पूर्णपणे झोपलेले आहेत ना त्यांना जनतेची चिंता ना कोणाची काळजी फक्त निवडणुका आल्या कि हात जोडायचे आणि मत मागायची एवढेच काम हे करतात.

______________________________________________

मी स्वतः धारूर येथील आंबाचोंडी रोडवरील कोविड सेंटर मध्ये दोन तास बसून होतो मला कोणीही विचारले नाही आडवले नाही मी आत मध्ये गेलो सगळीकडे फिरलो अक्षरशः दोन तास त्या ठिकाणी खोलीमध्ये बसलो पण एकही कर्मचारी मला विचारायला आला नाही आपण पॉझिटिव्ह नसताना इथे कसे सगळीकडे अस्वच्छता आहे डॉक्टर या ठिकाणी नसतात औषध गोळ्यांचा तुटवडा आहे एवढ्या औषध गोळ्या शासनाकडून आलेल्या जातात कुठे हा देखील प्रश्न आहे असा अनागोंदी कारभार जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित थांबवावा
— अतुल शिनगारे
युवा सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार

——————————————————————————
येथील कोविड सेंटर मध्ये सुरु असलेला अनागोंदी कारभार तालुका आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष तहसीलदार मॅडम व तालुका आरोग्य अधिकारी मॅडम यांनी त्वरित लक्ष देऊन सेंटरच्या कामकाजात सुधारणा करावी नसता युवा पत्रकार संघ व विश्व मानवाधिकार परिषद तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करेल. लोकप्रतिनिधींचे कार्य शून्य असल्याने या कामी पत्रकार बांधवांनी पुढाकार घ्यावा
– आतीक मोमिन
जिल्हा अध्यक्ष विश्व अधिकार परिषद

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा