मृत शिक्षकाच्या वारसांना दहा लाखाचा चेक व्याजासह देण्याचे बीड न्यायालयाचे आदेश




मृत शिक्षकाच्या वारसांना दहा लाखाचा चेक व्याजासह देण्याचे बीड न्यायालयाचे आदेश
बीड !
दिनांक १६-०१-२०१८ रोजी रेवकी येथील शिक्षक नामे हेमंत शेषेराव आव्हाड हे शेतात फेरफटका मारण्यास गेले असता मोटार अपघातात त्यांचा मृत्यू झाला . मयत हेमंत शेषेराव आव्हाड यांचे वारसांनी बीड येथील मोटार अपघात प्राधिकरण यांचे न्यायालयात मोटार अपघात नुकसान भरपाई कायद्यान्वये मो.अ.प्र.क्रं .१२ ९ / २०१८ असा अर्ज दाखल केला होता.सदरचा अर्ज मा.न्यायालयाने दिनांक ०६-०५-२०२१ रोजी निकाली काढला. त्यामध्ये मयत हेमंत शेषेराव आव्हाड यांचे वारसांची बाजु ग्राह्य धरुन मा.न्यायाधिश ( शेख मॅडम ) यांनी मयत हेमंत शेषेराव आव्हाड यांचे वारसांना रु .१,१०,०४,८२४ / – व्याजासह देण्या बाबत विमा कंपनीस आदेशीत केलेले आहे . सदर प्रकरणातील अर्जदारांच्या वतीने अॅड. एच.जी.महाजन , अॅड.सचिन जायभाये व अॅड.संजोत एस.महाजन यांनी काम पाहिले .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा