धारुर घाटातील 250 फुट दरीत कोसळला साखरेचा ट्रक ; चालक गंभीर जखमी




धारुर घाटातील 250 फुट दरीत कोसळला साखरेचा ट्रक ; चालक गंभीर जखमी.

सामाजिक कार्यकर्ते जयराम गायकवाड यांनी दाखवली तत्परता

किल्ले धारूर दि.16 (प्रतिनिधी )धारूर येथील घाटातील 250 फूट खोल दरीत काल रात्री १० ते ११ वाजेच्या दरम्यान केज येथील येडेश्वरी साखर कारखान्याची साखर घेऊन अहमदाबाद कडे जाणारा ट्रक दरीत कोसळला यात चालक गंभीर जखमी झाला आहे त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय मध्ये पाठवण्यात आले आहे सामाजिक कार्यकर्ते जयराम गायकवाड यांनी तत्परता दाखवत अपघातातील जखमींना मदत केली

काल रात्री धारूर येथील घाटात अवघड वळणावर ब्रेक निकामी झाल्याने साखर घेऊन जाणारे ट्रक जी यु ३१०० हा २५० फूट खोल दरी मध्ये पलटी खात दरीत कोसळला या ट्रकचा किन्नर अनिल पोगचिया यांनी उडी घेतली त्यामुळे तो बालबाल बचावला तर ट्रक ड्रायव्हर वनरकक्षी महेंद्रसिंग चुवासमा वय ४० वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे पाय मोडल्यामुळे तसेच अंगावरती इतर ठिकाणी दुखापत झाल्यामुळे चालकाला उठता देखिल येत नव्हते

येथील सामाजिक कार्यकर्ते जयराम गायकवाड यांनी त्वरित मदत कार्य करत पत्रकार पोलीस व आरोग्य विभाग यांना याची माहिती दिली धारूर येथील दोन्ही ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्यामुळे
तेलगााव येथील ॲम्बुलन्स डॉ एम बी गायकवाड , चालक बाळासाहेब बडे यांच्यासह लगेच उपलब्ध झाली.

पोलीस निरीक्षक सुरेखा धस व त्यांची टीम धारूर घाटामध्ये दाखल होऊन त्यांनी दरीत कोसळलेल्या ट्रकच्या ड्रायव्हरला दोरीने ओढून वर काढले मदत कार्य केले प्राथमिक उपचार करून लागलीच चालकाला पुढील उपचारार्थ आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा