धारूर महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिर व वृक्षारोपण संपन्न




धारूर महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिर व वृक्षारोपण संपन्


किल्ले धारूर l

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात दिनांक 28 जुलै 2023 रोजी मा. तहसीलदार श्री जीवककुमार कांबळे नायब तहसीलदार प्रकाश गोपड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे,पर्यवेक्षक प्रा सिद्धेश्वर काळे यांच्या उपस्थितीत 1 जानेवारी 2024 अहर्ता दिनांक वर आधारित ज्या विद्यार्थ्यांची 18 वर्षे वय पूर्ण होत आहेत त्यांच्यासाठी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे प्रास्ताविक लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा. डॉ. डी बी जाधव यांनी विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून नोंदणी करून लोकशाहीच्या यशस्वी करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा असे अवाहन केले तसेच धारूर शहरातील सर्व बीएलओही या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यामध्ये श्री लासूने, श्री लोकरे, श्री शिरसाठ, श्री राठोड यांची उपस्थिती होती यानंतर मा श्री प्रकाश गोपड नायब तहसीलदार निवडणूक विभाग धारूर यांनी मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण याबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी बीएलो श्री लासुने सरानी प्रत्यक्ष फील्ड वरील अनुभव कथन केला. कार्यक्रमाचा अध्यक्षिय समारोप अध्यक्ष प्राचार्य डॉ गोपाळ काकडे यांनी विद्यार्थ्यांना मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन केले तसेच यावेळी विद्यार्थ्यांना youtube च्या माध्यमातून मोबाईलच्या सहाय्याने किंवा ऑनलाईन मतदार नोंदणी कशा पद्धतीने करता येते याबद्दल व्हिडिओ दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच या कार्यक्रमानंतर महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण ही करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. डी बी जाधव यांनी तर आभार प्राध्यापक व्ही के कुंभारे यांनी मांडले.या कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ आर आर भोसले,प्रा अनिल जोगदंड यांनी विशेष परिश्रम घेतले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा