बाबुजी आव्हाड महाविद्यालयामध्ये नविन मतदार नाव  नोंदणी व युवा संवाद कार्यशाळा संपन्न




पाथर्डी
  बाबूजी आव्हाड महाविद्यालय,मतदार साक्षरता कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने
महसूल सप्ताह आयोजित नवीन मतदार नोंदणी व युवा संवाद कार्यशाळा पार पडली
या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाथर्डी तहसीलचे तहसीलदार मा. शाम वाडकर यानी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये नवीन मतदारांना लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी मतदानाचा हक्क किती महत्त्वाचा आहे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच एच.पी सानप(तलाठी) यांनी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला ऑनलाइन काढण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच मा. lनिकम भाऊसाहेब यांनी ई- पीक पाहणी संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे यांनी ही कार्यशाळा बहुसंख्य विद्यार्थी हे शेतकरी वर्गामधून येत असल्यामुळे त्यांच्यासाठी ही कार्यशाळा फलदायी ठरेल असे मत व्यक्त केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी नोडल अधिकारी प्रा.आनंद घोंगडे,डॉ.सुभाष शेकडे, डॉ.अशोक डोळस, डॉ.अर्जुन केरकल,आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आनंद घोंगडे यांनी तर आभार डॉ.अरुण राख यांनी केले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा