लोकसहभागातुन युवकांनी एकत्र येत केला मोगरा गावाचा रस्ता




लोकसहभागातुन युवकांनी एकत्र येत केला मोगरा गावाचा रस्ता
– नेत्यांना गावात करणार प्रवेशबंदी – युवकांचा संकल्प
माजलगाव ( प्रतिनिधी ): तालुक्यातील मोगरा गावाचा एक किलोमिटर अंतराच्या रस्त्यावर पन्नास ते साठ हजार रूपयांचा लोकसभाग करून युवकांनी एकत्र येत या रस्त्यावर मुरूम टाकत रस्ता केला असुन लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीचे या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्याने गावकरी रोष व्यक्त करत असुन गावामध्ये नेत्यांना प्रवेशबंदी करण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे.
 तालुक्यातील मोगरा ग्रामपंचायत  राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जाते. परंतु मागील काही दिवसांपासुन गावाला जोडणारा जोडरस्ता पुर्णतः खराब झाला होता. मोठ – मोठे खड्डे पडल होते. पावसामुळे रस्त्यावर पुर्णतः चिखल होता त्यामुळे येथुन ये – जा करणे अवघड झाले होते तर दुचाकी, चारचाकी गाड्या स्लिप होउन आपघात वाढले होते. परिणामी गावात येणारी बससेवा देखिल बंद झाली होती. त्यामुळे लोकप्रतिनिधी अथवा ग्रामपंचायतीने हा रस्ता करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांमधुन केली जात होती परंतु याकडे लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले. अर्धा पावसाळा संपला तरी देखिल रस्ता होत नसल्याने व गैरसोय वाढत असल्याने गावातील तरूणांनी पुढाकार घेत साठ हजार रूपयांचा निधी जमा करून या पैशातुन एक किलोमिटर अंतर असलेल्या या रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरता दुरूस्त केला आहे. दरम्यान ग्रामस्थांना लोकसहभागातुन हा रस्ता करावा त्रलागल्याने लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतींविरोधात रोष व्यक्त केला जात असुन आगामी निवडणुकीत नेत्यांना प्रवेश बंदी केली जाणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले. यावेळी विकास झेटे, बाबासाहेब शिंदे, उपसरपंच तुकाराम भोजणे, संदीप सावंत, रमेश तळेकर, कृष्णा घोंगाने, श्रीकृष्ण शिंदे, कृष्णा शिंदे, परमेश्वर मोकळे, नयुम अत्तार व ग्रामस्थ उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा