अधिक महिन्यातील जावायांना धोंडे जेऊ घालण्याची परंपरा आजही कायम




अधिक महिन्यातील जावायांना धोंडे जेऊ घालण्याची परंपरा आजही कायम
तीन वर्षांनंतर एकदा येणारा अधिक मास हा जावई मंडळींसाठी पर्वणीच
 यंदा १८ जुलैपासून अधिक महिना सुरू झाला तर १६ ऑगस्टला समाप्त होणार
ज्योतिराम पाढंरपोटे -माजलगाव
          अधिकमास म्हटला की जावयाला वाण देण्याची प्रथा नजरेसमोर येते.याला ‘धोंडा’ असेही म्हणतात.त्यामुळे १८ जूलै पासून सुरु झाला असुन दि १६ ऑगस्टला तो समाप्त होणार आहे.धोंड्याचा महिना निम्म्यावर आला असुन धोंडे जेवन म्हणजे जावईबापूंसाठी सुगीचा महिनाच असतो.विशेषतः नवविवाहित तरुणांसाठी सासरवाडीहून भेटवस्तूंची अधिक रेलचेल होत आहे.
या अधिकमासाच्या महत्वामुळे वाणाचा बाजारही सजला आहे.अनारशां ऐवजी बत्तासे,म्हैसूरपाक,वगैरे जाळीदार पदार्थ सध्या बाजारात विकण्यास आले आहेत.३३ वस्तूंचे हे पाकिट सुमारे ५० ते जास्तीत जास्त ३५० रूपयापर्यंत मिळत आहे.दिवे १० ते २५ रूपये नग,कपडे व इतर सामान यासाठीही बाजारपेठ सजली आहे.चैत्र,ज्येष्ठ श्रावण हे १२ वर्षांनी,आषाढ १८ वर्षांनी,भाद्रपद २४ वर्षांनी,आश्विन १४१ वर्षांनी कार्तिक ७०० वर्षांनी अधिकमास होतो.भाद्रपदा पर्यंतच्या मासांना अधिकमास म्हणतात.आश्विन कार्तिक अधिक झाले,तरी त्यास तसे म्हणत नाहीत.ज्यावर्षी आश्विन अधिक होतो,त्यावर्षी पौष क्षयमास होतो.अशावेळी दोन प्रहरांपर्यंत मार्गशीर्ष दोन प्रहरांनंतर पौष मानून दोन्ही मासांची धर्मकृत्ये एकाच महिन्यात करतात.या जोड मासाला संसर्प असे म्हणतात.
या महिन्यातील देव पुरुषोत्तम म्हणजे विष्णू मानले असून त्यांच्या कृपेसाठी पुढील विधी करण्यास सांगितले आहेत. पापक्षालनासाठी मलमास व्रत,प्रत्येक दिवशी अनारसे आदी पक्वान्ने ३३ या संख्येने कांस्यपात्रात भरून पात्रासह द्यायचे असते. महाराष्ट्रात अधिकमासात अनरशांचे वाण बहुधा जावयाला देतात.कन्या जावायास लक्ष्मी-नारायणस्वरूप मानले आहे त्यातून ही पद्धत आली असावी.त्यात जावईबापूंना कपडे,दागिने,भांडी स्वरुपात वस्तू भेट दिल्या जातात.पंचपक्वान्न गोड-धोडच्या जेवणावळी होतात. जी कर्मे अन्यवेळी करणे शक्य असेल,ती अधिकमासात वर्ज्य सांगितली आहेत,
अधिक मास म्हणजे काय?
१८ जुलै पासून अधिक मास सुरू होत असून दि १६ ऑगस्ट ला समाप्त होत आहे.हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे ३५५ दिवसांचे वर्ष असते,परंतु इंग्रजी व भारतीय सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते.म्हणजेच प्रतिवर्षी ११ दिवस चांद्रमास वर्षात सौरवर्षापेक्षा कमी असतात आणि हा ११ दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर तीन वर्षांनी (अचूकपणे सांगावयाचे झाल्यास ३२ महिने १६ दिवसांनी) एक महिना अधिक धरावा असे सांगितले आहे.दर महिन्याला सूर्य एका राशीतून संक्रमण करतो,परंतु या अधिक तेराव्या महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते म्हणून याला ‘मलमास’ असे सुद्धा म्हणतात.
     
.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा