वाढदिवसानिमित्त जमा शालेय साहित्याचे राजेंद्र मस्केंच्या हस्ते  करचुंडीत मुलांना वाटप




वाढदिवसानिमित्त जमा शालेय साहित्याचे राजेंद्र मस्केंच्या हस्ते  करचुंडीत मुलांना वाट.

बीड

भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचा नुकताच वाढदिवस झाला. या वाढदिवसानिमित्त हार-शाल-तुरे यावर खर्च न करता शुभेच्छा म्हणून शालेय साहित्य द्यावे असे आवाहन राजेंद्र मस्के यांनी केले होते. या आवाहनाला प्रतीसात देऊन पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी शालेय साहित्य दिले होते.

आज बीड विधानसभा मतदारसंघातील करचुंडी येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरामन भाऊ शिंदे यांच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. करचुंडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या हस्ते शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करचुंडीच्या उपसरपंच सौ.शितल राजाराम कोलगुडे होत्या. याप्रसंगी शांतीनाथ डोरले, बालाजी पवार,नागेश पवार,शरद बडगे, अनिल शेळके,महेश सावंत,संपत कोटुळे, पंकज धांडे,रवी कळसाने,आसिफ पठाण,बाबु धसे, गावचे पोलिस पाटील कल्याण भंडाणे, ग्रामपंचायत सदस्य संतोष मुळीक,कृष्णा कांगरे,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य उद्धव वीर,सुमय्या हसन शेख,सुरेश मोहिते, भिमराव कोलगुडे, प्रा.वैजिनाथ शिंदे सर,बाबुराव शिंदे,अमोल शिंदे, गणेश शिंदे, चत्रभुज भंडाणे, चंद्रशेन मुळीक, परमेश्वर शिंदे,विश्वनाथ माने  मुख्याध्यापक नांदेडकर सर व सर्व शिक्षकवृंद्ध ,सहशिक्षीका यांच्यासह गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा