ज्याचा कोणीही शत्रू नाही तो भगवंत म्हणजे श्रीकृष्ण – उद्धव प्रभुजी शास्त्री आज सोमेश्वर मंदिरात भगवंत श्रीकृष्ण




आज सोमेश्वर मंदिरात भगवंत श्रीकृष् आणि सुदामा यांची भेट कथेतून रंगणार

बीड
प्रत्येक देवाच्या हातात कोणते ना कोणते शस्त्र आहे. एकमेव भगवंत श्रीकृष्ण असे आहेत ज्यांच्या हातामध्ये सुमधुर आवाज, संगीत देणारी बासुरी आहे. ज्याचा कोणीही शत्रू नाही असा, सर्वांना हवाहवासा वाटणारा एकमेव प्रतिभावंत प्रतिमा असलेला सुंदर भगवंत म्हणजे श्रीकृष्ण होय असे अमृततुल्य विचार उद्धव प्रभुजी भक्ती शास्त्री यांनी 6 वे पुष्प गुंफताना व्यक्त केले.
बीड येथील सुप्रसिद्ध श्री सोमेश्वर मंदिरात संगीतमय भागवत कथेचे 6 वे पुष्प सोमवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 7 दरम्यान उद्धव प्रभुजी भक्ती शास्त्री यांनी आपल्या अमृततुल्यवाणीतून गुंफले. या संगीतमय भागवत कथेचे आयोजक श्री सोमेश्वर मंदिर ट्रस्ट अध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या भागवत कथेला रसिक भक्तामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुढे बोलताना उद्धव प्रभुजी शास्त्री म्हणाले की, जो आपल्या गुणांनी जगाला आपल्याकडे आकर्षित करतो तो म्हणजे भगवंत श्रीकृष्ण होय. त्यामुळे भक्तांमध्ये सर्वाधिक आवडणारा देव म्हणजेच श्रीकृष्ण होय. श्रीकृष्णाची प्रतिमा इतकी सुंदर आहे मग तो भगवंत प्रत्यक्षात किती सुंदर असेल याची कल्पना आपण करू शकता. भगवंत श्रीकृष्णाच्या बाललीला ते कंसाचा वध आपल्या संगीतमय भागवत कथेतून त्यांनी भक्तांच्या समोर आपल्या अमृततुल्यवाणीतून उभा केला. बकासुर, अगासुर या राक्षसांचा वध ते ब्रह्माजींचे गर्वहरण, इंद्राचा मीपणा दूर करणारा भगवंत म्हणजे श्रीकृष्ण होय भयंकर विषारी कालिया सर्पाच्या डोक्यावर नृत्य करणारा भगवंत म्हणजे श्रीकृष्ण असे विविध भागवत कथेतील श्री कृष्णाच्या लीला त्यांनी व्यक्त केल्या. पुढे बोलताना ते म्हणाले, प्रकृती हे आपले कार्य करते आपण केवळ निमित्त मात्र आहोत.सर्व करता-करविता भगवंत आहे. तो भोगता आहे, आपण भोग भोगणारे आहोत. असे वास्तव विचार त्यांनी व्यक्त केले. कथेचे सहावे पुष्प ऐकण्यासाठी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगीतमय भागवत कथेतील संगीताच्या आणि भजनाच्या सुमधुर आवाजात भक्तगण तल्लीन होऊन भजन करत होते.

आज भगवंत श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट
आजच्या संगीतमय भागवत कथेतून भगवंत श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट कशी झाली याचे वर्णन उद्धव प्रभुजी आपल्या अमृततुल्यवाणीतून करणार असून भागवत कथेच्या सातव्या पर्वाचा समारोप करणार आहेत. तेव्हा या कथेच्या समारोपपूर्व संगीतमय कथेला भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तथा श्री सोमेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा