रेमडीसिवीर इंजेक्शन गैरव्यवहार प्रकरणात कुंपनंच शेत खातंय – जिल्हाप्रशासनातील आधिका-यांचीच मिलिभगत




मुख्यमंत्री, प्रधान सचिव, सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्तांकडे तक्रार !

बीड!

जिल्ह्य़ातील रेमडीसिवीर इंजेक्शन वितरण विलंब, अनियमितता, गैरव्यवहार प्रकरणात जिल्हाप्रशासनातील आधिकारीच संगनमताने अनियमितता व काळ्या बाजारास चालना देत असून कुंपनंच शेत खात असल्याचा प्रकार असून याप्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटी मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड यांनी मुख्यमंत्री, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य, आरोग्य मंत्री, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना केली आहे .
बीड जिल्ह्य़ातील रेमडीसिवीर इंजेक्शन वितरण प्रणालीत वाटपास विलंब ,तसेच मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार होत असून काळ्या बाजारात रेमडीसिवीर इंजेक्शन विकण्याचे प्रकार आढळून येत असून जिल्हाप्रशासनातील वरिष्ठ स्तरावरून आधिकारी,उपजिल्हाधिकारी, आरोग्य विभागातील जिल्हाशल्यचिकित्सक,सहाय्यक,जिल्हाशल्यचिकित्सक,जिल्हारूग्णालय बीड औषध निरीक्षक आदिंचा यात हात असल्याच्या लेखी तक्रारी प्राप्त असून ,ठराविक हाॅस्पिटल व ठराविक तालुक्यांनाच नियमबाह्यपणे वाटप केले जाते, त्यामुळेच
मागण्या:-
1)बीड जिल्ह्य़ातील हाॅस्पिटल यांना कोणत्या नियमाच्या आधारे रेमडीसिवीर इंजेक्शन वितरीत करण्यात आले, ऊदाहरणार्थ दि.13 मे 2021 रोजी एकुण बीड जिल्ह्य़ातील 72 इंजेक्शन पैकी 60 इंजेक्शन एकट्या परळी तालुक्यातील जैन डिस्ट्रीब्यूटर्स यांना वाटप करण्यात आले, तर दि.16 मे 2021 रोजी डाॅ.सुर्यकांत गिते जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड यांच्या दिप हाॅस्पिटल मध्ये कोरोना रूग्ण संख्या 0 दाखवली असताना 46 इंजेक्शनची मागणी करण्यात आली आणि विशेष म्हणजे 19 इंजेक्शन देण्यात आली, त्याचप्रमाणे लाईफलाईन हाॅस्पिटल यांना एकुण 27 इंजेक्शन वितरीत करण्यात आली, या दोन्ही हाॅस्पिटललाच जास्तीचे इंजेक्शन वितरीत करण्यामागे कारण काय एकंदरीतच मागील 2 महिन्यांचे त्या रूग्णालयात अडमिट रूग्ण व त्यांना देण्यात आलेले इंजेक्शन यांची सखोल तपासणी करण्यात यावी कारण आस्तित्वातच नसलेले व बोगस रूग्ण दाखवून रेमडीसिवीर इंजेक्शन घेऊन काळ्या बाजारात 25-70 हजारापर्यंत विकल्याच्या तक्रारी आहेत, याविषयी विविध दैनिकातुन बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
2) काही तालुक्यात 7-8 दिवस रेमडीसिवीर इंजेक्शन वितरीत करण्यात येत नाही त्यादरम्यान ज्यांच्या नावावर इंजेक्शन रजिस्ट्रेशन केले आहे त्यांचा मृत्यु अथवा डिस्चार्ज झाल्यानंतर त्या इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री होत आहे.
3)दररोज नियमित जिल्ह्यासाठी आलेले व हाॅस्पिटल व नातेवाईक यांना वितरीत केलेल्या रेमडीसिवीर इंजेक्शनची माहिती प्रसिद्धि माध्यमे तसेच सामाजिक कार्यकर्ते यांना देण्यात यावी.
वरील प्रकरणात योग्य ती उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटी मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा जनप्रक्षोभाला सामोरे जावे लागेल याची जिल्हाप्रशासने नोंद घ्यावी.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा