रेमडीसिवीर इंजेक्शन प्रकरणात जिल्हाधिका-यांना नारळ फोडून नवस




_बीड !

जिल्ह्य़ातील रेमडीसिवीर इंजेक्शन वितरण विलंब, अनियमितता, गैरव्यवहार प्रकरणात जिल्हाप्रशासनातील आधिकारीच संगनमताने अनियमितता व काळ्या बाजारास चालना देत असून कुंपनंच शेत खात असल्याचा प्रकार आढळून येत आहे या प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटी मार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी सर्वसामान्यांसाठी मंदिरा समान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुलाल, फुले वाहून श्रीफळ फोडून देवासमान जिल्हाधिकारी यांनी गोरगरीब जनतेला न्याय द्यावात यासाठी नवस बोलण्यात आला.व जिल्हाधिकारी,निवासी उपजिल्हाधिकारी मिटींग मध्ये असल्या कारणाने तहसिलदार बन यांना डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड, तसेच शेख युनुस च-हाटकर भ्रष्टाचार निर्मूलन समिती बीड तालुकाध्यक्ष यांनी निवेदन देण्यात आले.

बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप हे देवमाणुस असल्याने त्यांच्याकडे कितीही निवेदने दिली तरी कुठल्याच दोषींवर कारवाई करत नसल्याने देवमाणसाच्या कार्यालयाबाहेर निवेदन,,गुलाल, फुले, अगरबत्ती, नारळ फोडून त्यांनी गोरगरीबांना न्याय देण्यासाठी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी असा नवस बोलण्यात आला.

बीड जिल्ह्य़ातील रेमडीसिवीर इंजेक्शन वितरण प्रणालीत वाटपास विलंब, तसेच मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार होत असून जिल्हाप्रशासनातील आधिकारीच उपजिल्हाधिकारी, आरोग्य विभागातील जिल्हाशल्यचिकित्सक, सहाय्यक जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड, औषधी निरीक्षक आदिंचा यात हात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तसेच संवेदनशील नागरीकांनी लेखी तक्रारी केल्या असून ठराविक हाॅस्पिटल व ठराविक तालुक्यांनाच नियमबाह्यपणे वाटप केले जाते, त्यामुळेच जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.सुर्यकांत गिते यांच्या मालकीच्या दिप हाॅस्पिटलला आणि लाईफ लाईन हाॅस्पिटललाच मोठ्या प्रमाणावर रेमडीसिवीर इंजेक्शन दिले जात आहेत, त्याचप्रमाणे बीड जिल्ह्य़ातील पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळी तालुक्याला जास्त प्रमाणावर रेमडीसिवीर इंजेक्शन खैरात वाटल्याप्रमाणे वाटली जात आहेत. तर माजलगाव, धारूर, वडवणी, आदिंना इंजेक्शन दिल्याची नोंद आढळुन येत नाही तर केज, अंबाजोगाई, गेवराई यांना कमी इंजेक्शन दिल्याची नोंद आहे.

खाजगी हाॅस्पिटलला रेमडीसिवीर इंजेक्शन दिलेल्या रूग्णांची पडताळणी करून ऑडीट करा .

बीड जिल्ह्य़ातील खाजगी रूग्णालयातील ज्या रूग्णांना रेमडीसिवीर इंजेक्शन दिले जाते त्याचे ऑडीट करण्यात यावे कारण कागदोपत्रीच बोगस रूग्ण दाखवून रेमडीसिवीर इंजेक्शन घेऊन काळ्या बाजारा 25-70 रूपयापर्यंत विक्री केल्याच्या घटना घडल्या आहेत. आरोग्य विभागातील व जिल्हाप्रशासनातील आधिकारीच सामिल असल्या कारणाने उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटी मार्फत चौकशी करण्यात यावी.

ना. धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत की परळीचे ?- डाॅ.गणेश ढवळे

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री व बीड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे संपुर्ण बीड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आहेत की फक्त परळीचे असा प्रश्न बीडकरांना पडलेला आहे कारण दि.13 मे रोजी बीड जिल्ह्य़ातील एकुण आलेल्या 72 रेमडीसिवीर इंजेक्शन पैकी 60 इंजेक्शन एकट्या परळी येथील जैन डिस्ट्रीब्यूटर्स यांना वाटप करण्यात आले, त्यामुळेच महाराष्ट्र राज्यांचे सामाजिक न्याय मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्य़ात जनतेला सामाजिक न्याय देता येईल.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा