रासायनिक व मिश्र खतांची दरवाढ कमी करा




पेरणीपूर्वी रासायनिक व मिश्र खतांची दरवाढ कमी करा-खा.प्रितमताई मुंडे 

बीड !

खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमतींमध्ये झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.कोरोना महामारीच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमती कमी करणे आवश्यक आहे.यासंदर्भात खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहिले आहे.पेरणीपूर्वी खतांची दरवाढ कमी करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमतींमध्ये केलेल्या अत्याधिक दरवाढीने राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.महामारीच्या संकटात अन्नदात्या बळीराजावर दरवाढीचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये म्हणून तात्काळ उपाययोजना होणे आवश्यक आहे.यासंदर्भात खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी केली आहे

.गेल्या वर्षीच्या तुलनेत खतांच्या किंमतींमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे.कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना खतांच्या किंमतीमध्ये झालेली दरवाढ आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही.शिवाय खरीप हंगाम देखील नजीक आला असल्याने पेरणीपूर्वी रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमती कमी होणे आवश्यक असल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी म्हंटले आहे.केंद्र सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला प्राधान्य दिल्यामुळे खतांच्या किंमती कमी करण्यासंदर्भात देखील सकारात्मक पाऊल उचलले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा