जिजाऊ मॉंसाहेब मल्टीस्टेट ठेवीदारांच्या लढ्यात सहभागी होणार – राजेंद्र मस्के




जिजाऊ मॉंसाहेब मल्टीस्टेट ठे

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळासह भेट घेणार ..!

*प्रशासनाने साथ न दिल्यास 20 ऑगस्ट नंतर तीव्र आंदोलन – ॲड अप्पासाहेब जगताप*

बीड
बीड मधील जिजाऊ मॉंसाहेब मल्टीस्टेटने दीडशे कोटी पेक्षा अधिकचा घोटाळा करून गोरगरीब सर्व सामान्य जनतेला लुबाडले आहे. या प्रकरणात गुन्हा नोंद असून, ठेवीदार कृती समिती मार्फत गेली दोन महिन्यापासून संघर्ष चालू आहे. कृती समितीचा लढा दिल्लीपर्यंत पोहचला आहे. या लढ्याला शास्वती देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन या घोटाळ्याचा तपास सखोल आणि गतिमान करण्यासाठीची एसआयटी गठीत करण्याची मागणी करणार आहे. गोरगरीबांचा कष्टाचा पैसा असून, तो त्यांना मिळाला पाहिजे. न्याय हक्कासाठी ठेवीदारांच्या लढ्यास आपला पाठींबा असून, या लढ्यात सहभागी होऊन संघर्ष करणार असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी जिजाऊ मॉंसाहेब मल्टीस्टेट ठेवीदारांना दिला.
आज जिजाऊ मॉंसाहेब मल्टीस्टेट ठेवीदार कृती समितीची बैठक चाणक्यपुरी बीड येथे कृती समितीचे अध्यक्ष ad अप्पासाहेब जगताप, मार्गदर्शक अशोकराव हिंगे, सुहास पाटील, डॉ अरीवंद काकडे,इंजी. एम बी वनवे, मारुतीराव तिपाले, शेख कुतुब, रवींद्र पालीमकर, परसे सर, सूर्यभान नवले आदी प्रमुख आणि हजारो ठेवीदारांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
प्रशासनाने साथ न दिल्यास 20 ऑगस्ट नंतर तीव्र आंदोलन – ॲड अप्पासाहेब जगताप
जनतेचा पैसा परत मिळावा. यासाठी ठेवीदार कृती समिती पोलीस प्रशासन, न्यायालय, भारत सरकार, राज्य सरकार यांच्याकडे कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करत आहे. 20 ऑगस्ट पर्यंत प्रशासनाकडून ठोस पाऊल उचललं जाईल. अशी अपेक्षा कृती समिती व ठेवीदारांना आहे.परंतु याकडे दुर्लक्ष झाले तर मात्र ठेवीदार तीव्र आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहेत. वेळ पडल्यास निश्चितपणे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष ॲड अप्पासाहेब जगताप यांनी दिला आहे.
परवा ठेवीदारा कृती समितिचे अध्यक्ष ॲड अप्पासाहेब जगताप, अशोकराव हिंगे, इंजी. वनवे, सूर्यभान नवले, भास्कर मिसाळ यांनी दिल्ली येथे जाऊन अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या माध्यमातून गृहमंत्री ना. अमित शहा, मुख्य रजिस्टर भारत सरकार यांच्याकडे ठेवी घोटाळ्याची सविस्तर माहिती सह तक्रारीचे निवेदन दाखल केले आहे. भारत सरकारच्या माध्यमातून लवकरच या प्रकरणात कठोर पाऊल उचलले जाईल. असा विश्वास मिळाला आहे. ठेवीदारांचा पैसा परत मिळाला पाहिजे यासाठी राज्य शासनाने एस आय टी स्थापन करावी. यासाठी लवकरच कृती समिती आणि ठेवीदार गृह मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेणार आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा