शरद पवार साहेबांच्या स्वाभिमान सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा-विजय लव्हाळे




 

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस मधील मोठा गट शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब हे महाराष्ट्र मध्ये ठीक ठिकाणी सभा घेत आहेत. बीड शहरामध्ये गुरुवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी शरद पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी स्वाभिमान सभेला सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा नेते विजय लव्हाळे यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तसेच ग्रामीण भागात आदरणीय साहेबांच्या स्वाभिमानी सभे बाबत उत्साह आहे. युवक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक असे सर्वच आदरणीय साहेबांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील परिस्थिती पाहता महाराष्ट्राचे नेतृत्व फक्त शरद पवार साहेबांनीच करावे अशी भावना जनमानसाची आहे . या ऐतिहासिक सभेमध्ये शरद पवार साहेब काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीडमध्ये होत असलेल्या स्वाभिमान सभेसाठी जिल्ह्यातील नागरिकांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवा नेते विजय लव्हाळे यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा