प्रत्येक गावात 1जागा; भरती प्रक्रिया होणार सुरू




कोतवाल भरती प्रक्रिया -2023
 बीड, दि.18 (जि.मा.का.):- कोतवाल भरती प्रक्रिया -2023 च्या अनुषंगाने कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून सर्व तालुक्यांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सदर जाहिरातीमध्ये अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिनांक 18/08/2023 हा नमूद करण्यात आलेला आहे. तसेच कोतवाल भरती प्रक्रियेच्या अर्जासोबत राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश खुल्या प्रवर्गासाठी रुपये 500/-व मागास प्रवाहासाठी रुपये 400/- परीक्षा शुल्क म्हणून सादर करणेबाबत जाहिरातीद्वारे कळविण्यात आलेले आहे. तथापि, बँकेच्या कार्यालयीन कामकाजांचे दिवस व या महिन्यात आलेल्या शासकीय सुट्या यामुळे उमेदवारांना डीडी (धनाकर्ष)काढण्यास अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने अर्ज दाखल करण्याची मुदत दिनांक 23/8/2023 पर्यंत वाढण्यात येत आहे. दिनांक 19/8/2023 व दिनांक 21/08/2023 व दिनांक 22/08/2023 दिनांक 23/08/2023 या दिवशी अर्ज संबंधित तहसील कार्यालय स्वीकारण्यात येतील.
  त्याचबरोबर अर्ज स्वीकारण्याच्या तारखेत झालेल्या बदलामुळे पात्र/अपात्र उमेदवारांची यादी दिनांक 22/08/2023 ऐवजी दिनांक २४/८/२०२३ रोजी संबंधित तहसील कार्यालयाचे तसेच संबंधित विभागीय अधिकारी कार्यालयाचे नोटीस बोर्डावर व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ https://beed.gov.in यावर प्रसिद्ध करण्यात येईल.असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकादवारे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा