अमरधाम स्मशानभूमीची दुरावस्था; लोखंडाचे संरक्षक कठडे तुटले ! दुरूस्तीसाठी – बीयाणी यांची मागणी




  • *बीड!
  • येथील अमरधाम स्मशानभूमीतील लोखंडाचे कठडे तुटल्याने अंत्यसंस्कार करताना मोठ्या अडचणी येत आहेत. नगर परिषदेने कोरोना काळात फार काही केल्याचे दिसले नाही. आता किमान स्मशानभूमीतील लोखंडी कठड्याची दुरूस्ती तरी करावी. 25 मे पर्यंत दुरूस्ती केली नाही तर स्मशानभूमीत उपोषण करू असा ईशारा भाजपाचे भगीरथ बीयाणी यांनी दिला आहे.
    सध्या कोरोना महामारीने हाहाकार माजलवला आहे. लॉकडाऊन आणि कडक निर्बंधामुळे लोक घराच्या बाहेर पडत नाहीत. या कठीण काळात ईतर आजार किंवा वृध्दपकाळाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्काराला जवळचे पाच- दहा लोकच उपस्थित असतात. या परिस्थितीत बीड येथील मोंढा रोडवर असलेल्या अमरधाम स्मशानभूमीतील लोखंडी संरक्षक कठड्यांची दुरावस्था झाल्याने मयतांवर अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अंत्यसंस्कार करण्याच्या जागेवर उभारलेले लोखंडाचे संरक्षक कठडे सुव्यवस्थीत असताना चार क्विंटल लाकूड लागत असे. लोखंडी कठडे तुटल्याने आता 7 क्विंटल लाकूड लागत आहे. कठडे नसल्यामुळे चिता जळत असताना लाकडे ढासळत आहेत. यामुळे अगोदरच दु:खात असलेल्या मयतांच्या नातेवाईकांना मोठा त्रास होत आहे. मयतांच्या नातेवाईकांना होत असलेल्या मानसिक त्रासाची दखल घेऊन बीड नगर परिषदेने आठ दिवसात अमरधाम स्मशानभूमीतील लोखंडी संरक्षक कठड्यांची दुरूस्ती करावी. 25 मे 2021 पर्यंत बीड नगर परिषदेने दुरूस्ती केली नाही तर अमरधाम स्मशानभूमीत उपोषण करू असा ईशारा भाजपचे नेते भगीरथ बीयाणी यांनी दिला आहे.
    कोरोना महामारी काळात नागरीकांसाठी फार काही करू न शकलेल्या बीड नगर परिषदेने किमान स्मशानभूमीची तरी दुरस्ती करावी असे बीयाणी यांनी म्हटले आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा