आ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते सायकलचे वाटप




शैक्षणिक उपक्रम…

गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या शुभहस्ते मौजे.मालेवाडी (ता.गंगाखेड) येथील दाजी नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळेत सायकलचे वाटप करण्यात आले.

परभणी जिल्हा परिषद मानव विकास अंतर्गत संपन्न झालेल्या या सायकल वाटप उपक्रमात गरजू तब्बल ६८ मुलींना सायकल देण्यात आली. त्यामुळे परिसरातून शाळेत ये-जा करणाऱ्या मुलींचा प्रवासात मदत होईल. त्यामुळे मुलींना विशेष आनंद झाला आहे.

‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ हे ब्रीद घेवून शासन गावखेड्यातील सावित्रीच्या लेकींना शैक्षणिक पाठबळ देत आहे. त्यामुळे ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ हा नारा सशक्त होत‌ आहे, असे मत कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी व्यक्त केले.

यावेळी मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य विठ्ठलराव रबदडे मामा, ॲड.व्यंकटराव तांदळे, संस्थापक अध्यक्ष बाबुराव पवार, प्राचार्य रामचंद्र पवार यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा