बीडच्या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा – धर्माधिकारी




जिल्ह्याची अस्मिता, सन्मान व विकासाची नांदी ठरणाऱ्या बीडच्या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा -बाजीराव भैय्या धर्माधिकारी

परळी वैजनाथ(दि. 26) – रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड शहरात होत असलेली सभा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्याच्या उत्तरदायित्वाची सभा आहे.या सभेचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार नियोजन करण्यात आले आहे.अजितदादांसह सर्वच मंत्र्यांच्या व मान्यवरांच्या स्वागतासाठी बीड जिल्हा उत्सुक आहे.या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.
बीड येथे रविवारी दि.27 रोजी दुपारी 3 वा. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा.प्रफुल पटेल, खा.सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री कु. आदीतीताई तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांसह जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय व मान्यवरराष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा पवार व मंत्रिमंडळातील सर्वच सदस्य प्रथमच बीड जिल्ह्यात येत आहेत.
तरी परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी,सर्व आघाड्यांचे पदाधिकारी,सदस्य, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने या अस्मितेच्या व जिल्ह्याच्या सन्मानाच्या सभेला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा