मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा जाहीर निषेध- आ.संदीप क्षीरसागर




 

लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार, हे सरकारचे अपयश

बीड दि.१ (प्रतिनिधी):- जालना जिल्ह्यातील सराटी वडगाव याठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजबांधवांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनावर पोलीसांकडून निर्दयीपणे लाठीमार करण्यात आला. आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील सराटी वडगाव गावात आक्रोश मोर्चा व मनोज जरांगे या कार्यकर्त्याचे उपोषण सुरू होते. उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने पोलीसांकडून उपोषण थांबवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु एवढ्या मोठ्या आंदोलनाची दखल सरकारने घेणे अपेक्षित होते. याउलट पोलीसांच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांवर दडपशाही करण्याचा डाव सरकारडून झाला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. अशाप्रकारे मराठा समाजबांधवांवर लाठीमार करण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. सगळयात जास्त खेदजनक घटना तिथे उपस्थित असलेल्या महिलाभगिनींनाही मारहाण झाली आहे. या घटनेचा बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा