तुळशीची माळ पहा रक्ताने माखली




व्हा वारकरी

तुळशीची माळ पहा रक्ताने माखली

राजकीय उत्तरे दिली जातील , डॅमेज कंट्रोल म्हणून हे प्रकरण हाताळले जाईल , सलोखा आणि शांतता भंग पावली पाहिजे असेच का त्यांना वाटत असावे . हे आंदोलन आणि त्या मागची निरागस भावना सरकार ला माहीत होते , फडणवीस यांनी मगाशी म्हटले पोलिसांवर दगड फेकली जाणार होती , फेकली असे ही म्हटले मात्र या माळकरी माऊलीने कुठला दगड फेकला हे एकदा सिद्ध करावे , लाखोंचे मोर्चे काढून मागणी मान्य होत नसल्याने लढा संवैधानिक पातळीवर चालू होता , जरांगे यांचे आंदोलन सोडवता आले नाही हे सरकारी अपयश काठीच्या अवतारात निष्पाप आया बाया वर का ? गृहमंत्री जे बोलतात ते राजकीय नुकसान होऊ नये म्हणून मात्र राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही या वेदना कधी समजून घेणार आहोत की नाही , नेहमी राजकीय गणिते करताना फोडाफोडी करताना सत्ता पक्ष ज्या टोकाला येऊन थांबला आहे , त्याला टकमक टोक असे म्हणतात
तुळशीची माळ घालून आता वारकरी झाले पाहिजे
           लोकपत्रकार

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा